pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शिक्षिका शर्मिला महेंद्र गावंड द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित.

0 3 1 1 7 9

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.21

शिक्षण क्षेत्रात गेली २० वर्षे निस्वार्थी वृत्तीने कार्य करणाऱ्या पिरकोन येथील रहिवाशी व नवीन शेवा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या शर्मिला महेंद्र गावंड यांना द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार देवून गौरव करण्यात आले.रायगड जिल्हा परिषद शाळा नवीन शेवा येथे कार्यरत असलेल्या शर्मिला गावंड यांनी कोरोना काळापासून ऑनलाईन शिक्षणाचे धडे मुलांपर्यंत पोहचविण्याचे काम केले, आजपर्यंत त्यांनी अनेक उपक्रम राबविले या कामाची दखल घेवून त्यांना द्रोणगिरी पुरस्कार देण्यात आला.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी आदर्श शिक्षिका शर्मिला महेंद्र गावंड यांना द्रोणागिरी भूषण आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

खेळाडू व कलाकारांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून दरवर्षी द्रोणागिरी युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा दिनांक २० डिसेंबर २०२३ ते २४ डिसेंबर २०२३ या दरम्यान बोकडविरा चारफाटा (एनएमएसईझेड मैदान ), पेट्रोल पंप जवळ, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे रायगड जिल्हास्तरीय २३ वा युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी या महोत्सवाचे उदघाटनच्या नंतर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा द्रोणागिरी भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर माजी आमदार मनोहरशेठ भोईर, जेएनपीटीचे माजी विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील, जेष्ठ साहित्यिक एल बी पाटील, कवीश्री अरुण म्हात्रे,जेष्ठ गायक भालचंद्र म्हात्रे,जेष्ठ पत्रकार मिलिंद खारपाटील,द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत,महिला विभाग प्रमुख वैशालीताई घरत,उपाध्यक्ष मनोज पडते, खजिनदार शिवेंद्र म्हात्रे, सल्लागार नरेश म्हात्रे, सचिव दिलीप तांडेल, क्रीडा प्रमुख भरत म्हात्रे व द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

————————————– ————————

शर्मिला महेंद्र गावंड यांनी राबविलेले उपक्रम.आणि मिळालेले पुरस्कार खालीलप्रमाणे :-

२०१६ साली रोटरी क्लब पनवेल यांच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार देण्यात आला.

२०१९ साली कोरोना काळात शाळा बंद असल्यापासून व्हिडीओ च्या माध्यमातून सतत शिक्षण चालू ठेवलं.

२४ फेब्रुवारी रोजी उरण तालुका शैक्षणिक साहित्य निर्मितीत तालुक्यात दुसरा क्रमांक आला.

२०२१ या वर्षी शिक्षक पतपेढी वर संचालिका म्हणून निवडून आली.

२०२२ मध्ये उरण पूर्व विभाग दहा गाव माझी विद्यार्थी संघाकडून सन्मानित करण्यात आला.

नोव्हेंबर २०२२ ला शासकीय अध्यापक विद्यालय पनवेल यांची विद्या प्रवेश अंतर्गत उपक्रमाचा लेख छापून आला. उरण मधून एकमेव उपक्रम.

नोव्हेंबर २०२२ च्या दिवाळीत महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान यांच्या कडून उत्कृष्ट रांगोळी म्हणून गौरविण्यात आले.

ऑगस्ट २०२३ मध्ये वशेनी इतिहास मंडळाच्या वतीने व्हिडिओच्या नवोपक्रमशिल शिक्षिका म्हणून पुरस्कार देण्यात आला.

५ सप्टेंबर २०२३ रोजी ,महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आदर्श शिक्षिका म्हणून सन्मानित करण्यात आला .

ऑक्टोंबर २०२३ मध्ये महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानच्या वतीने रांगोळी स्पर्धेत सन्मानित करण्यात आला .

स्कॉलरशिप ,स्पर्धा परीक्षा ,सूत्र संचालन ,कोरिओग्राफी ,रांगोळी या सर्व क्षेत्रात सतत अग्रेसर असतात.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 1 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे