जालना शहरातील अंबड रोडवरील पांगारकर नगर मध्ये इंद्र दरबार हॉटेल ते जि.प.कर्मचारी सहकारी पतसंस्था या रस्त्याच्या सिमेंटीकरण, भूमिगत गटार योजना आणि पेव्हर ब्लॉक कामाचे भूमिपूजन काल रविवारी आ. कैलास गोरंटयाल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी बी. एस. कराड, वाघतकर, देशपांडे, काळूशे, कांबळे, शिंगणे, साबळे, शिंदे,भाबड, खेडकर, नागरगोजे, मुंडे, राजगुरू, क्षीरसागर, राम सावंत, माजी नगरसेवक विनोद रत्नपारखे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना आ. गोरंटयाल म्हणाले की, जायकवाडी – जालना या पाणी पुरवठा योजनेमुळे शहरातील जनतेला किमान आठ दिवसाला तरी पाणी पुरवठा होत आहे. ही योजना कार्यान्वित झाल्याने जालनेकरांवरचे संकट दूर होण्यास मोठी मदत झाली असून जालना येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणण्यासाठी देखील आपल्याला राज्य सरकारशी मोठा संघर्ष करावा लागला आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनातही आपण मेडिकल कॉलेजसाठी आग्रही भूमिका मांडली आणि त्यामुळेच सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत या कॉलेजची इमारत बांधकाम व अन्य कामांसाठी ४०४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आपल्या शेजारी असलेल्या जिल्ह्यात कोणते ना कोणते विद्यापीठ असून तसेच एखादे विद्यापीठ जालना येथे व्हावे यासाठी भविष्यात आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे आ. गोरंटयाल यांनी यावेळी स्पष्ट केले. तत्पूर्वी परिसरातील ज्येष्ठ नागरिक श्री बी.एस. कराड, ढेंगळे आणि विनोद रत्नपारखे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे नियोजन शिलाताई ढाकणे यांनी केले. सुत्रसंचालन सौ. प्रभाताई गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन सौ. मीनाताई देशपांडे यांनी मानले. या कार्यक्रमास सौ. उज्वला साबळे,सौ. संगिता काळुशे,सौ. विद्या खेडकर, सौ. अलका भाबड,सौ.शोभा शिंदे, सौ. सविता पाटील, सौ. पुष्पा क्षिरसागर,सौ. अर्चना गायकवाड,
सौ. किरण शिंगणे, सौ. सविता वाघतकर, सौ. विद्या चव्हाण, सौ. सविता धोंड यांच्यासह परिसरातील महीला व पुरुष आणि युवकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.