अर्चना सोनार च्या नेतृत्वात उन्हाळी शिबिरास उत्कृष्ट प्रतिसाद

वृत्तसंकलनःआत्माराम ढेकळे,दि.26
पुणेः- येथील पिंपरी-चिंचवड भागातील प्रसिध्द योगगुरु अर्चना सोनार यांनी स्वंयसेवी संस्था व व्हाट्सअॕप ग्रुपच्या माध्यमातून ‘आॕनलाईन उन्हाळी शिबिराचे ‘आयोजन केले होते.त्यामध्ये विविध वस्तु तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.व त्यास उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.
स्त्रीशक्ती फाउंडेशन पुणे अंतर्गत अध्यात्मिक गजानन बाल संस्कार केंद्रातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्थापक अध्यक्षा सौ.अर्चना ईश्वर सोनार यांच्या नेतृत्वाखाली दि.१६ मे ते २२मे २०२३पर्यंत सोळा वर्षाखालील लहान मुलांसाठी आॕनलाईन प्रामुख्याने विनामुल्य राज्यस्तरीय उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.अध्यात्मिक गजानन बाल संस्कार केंद्रातील प्रशिक्षक(ट्रेनर) यांनी आपल्या कला कौशल्यानुसार लहान मुलांना प्रात्यक्षिकासहीत उत्तम प्रकारे प्रशिक्षण दिले.यामध्ये प्रामुख्याने मातीच्या चिखलापासुन भांडी तयार करणे,टाकावु पासुन टिकावु वस्तु बनविणे,फोटोफ्रेम,ड्रीमक्रॕचर,माचिस बाॕक्स पासुन ट्रॕक्टर तयार करणे, आकाश कंदिल,क्राफ्टची विविध फुले,मंडेला आर्ट,दिवाळीसाठीच्या आकर्षक पणत्या सजविणे,विविध स्केचेस,चीज आर्ट,शेंगदाण्याचे लाडु इ.तसेच शिवकालीन मर्दानी खेळ आणि जर्मन भाषेची प्रारंभिक ओळख घरबसल्या आॕनलाईनच्या माध्यमातून मुलांना शिकायला मिळाले.यासाठी ट्रेनर मुले सर्वज्ञा कोरडे,रुदधवी सोनवणे,स्वरा दुसाने,सार्थक कर्णे,समर्थ कर्णे,समृद्धी वखारकर,साईराज सोनार,सई शिंदे, श्रेया सावंत,वरद वखारकर,मयुरी जोशी,संचिता पाटील,निलय जाधव,जान्हवी जाधव यांनी सहभागी मुलांना प्रशिक्षण दिले.यासाठी परिक्षक म्हणुन श्रीमती अनिता कोहिनकर,सौ.मेघाताई देवपुरकर,सौ.मृणाल सोनार ,सौ.स्वाती पाटील,कु.स्नेहा सोनार,कु.ईशा सोनार,डाॕ.सौ.स्वाती पवार यांनी काम पाहिले.तर शेवटच्या दिवशी मराठा,प्राचीन,सातवाहन, इस्लामिक,शिवराई,ब्रिटीशकालीन संग्रहीत सुमारे पाच हजार नाणी व नोटांची ओळख संग्राहक प्रमोद काशीकर यांनी सविस्तर दिली.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार आत्माराम ढेकळे,रुग्वेद टुडे न्युज चॕनेलचे संचालक दिनेश येवले , सौ.किरण दंडगव्हाळ हे उपस्थित होते.