जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने कार्यशाळा संपन्न

जालना/प्रतिनिधी,दि. 30
जालना ते छत्रपती संभाजीनगर हे पुढील काळात औद्योगिक हब होण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा दाखला देत जालना ड्रायपोर्टच्या माध्यमातून भविष्यात वेगाने निर्यात होवू शकते. जालना जिल्ह्यात उत्पादन तसेच इतर देशांना होणाऱ्या निर्यातीत वाढ होण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
भारत सरकारच्या प्रत्येक जिल्हा हा निर्यात केंद्र या उपक्रमातंर्गत जालना जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दि.29 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी उद्योग सहसंचालक बी.टी.यशवंते, महाव्यवस्थापक योगेश सारणीकर, सहायक व्यवस्थापक पांडूरंग बावणे, अमोल मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्य निर्यात धोरण अंतर्गत उद्योजकांना देय असणाऱ्या प्रोत्साहनाबाबत तसेच निर्यात धोरणाची थोडक्यात माहिती श्री.यशवंते यांनी दिली. कृषी आधारित उत्पादनांची निर्यात करण्यासंबंधी अमोल मोहिते यांनी जिल्ह्याच्या निर्यातीसंबंधी सादरीकरण केले. व मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेस उद्योजक, निर्यात शेतकरी उत्पादक संघटना उपस्थित होते. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.