जांभूळपाडा चिरले येथील राकेश कातकरी यांच्या कुटुंबाकरिता धावून आले चैतन्य पाटील,डॉ सुयश मढवी , प्रमोद सावंत व शिवसेना वैदकीय मदत कक्ष टीम

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.9
मागील दिनांक १२ जानेवारी २०२५ रविवार रोजी दुपारी ४ च्या सुमारास जांभुळपाडा आदिवासी वाडी येथील कु. लकेश राकेश कातकरी हा १४ वर्षाचा मुलगा गव्हाण येथील त्याचा आजीच्या गावी गेला असता खेळायला गेला असताना विजेचा २२००० वोल्ट इतका अतिशय तीव्र झटका त्याला लागला होता व त्याच्या अंगावरील कपड्यांनी क्षणात पेट घेऊन तो सुमारे ६०% भाजून निघला होता. या सर्व घटनेची माहिती शिवसेना वैदकीय मदत कक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख चैतन्य पाटील यांस मिळताच त्यांनी डॉ. सुयश मढवी यांसमवेत त्वरित एनएमएमसी रुग्णालय वाशी येथे धाव घेतली तिथल्या आरएमओ व डॉक्टरांसोबत चर्चा केल्यावर त्यांनी त्याच्या आजाराबाबत पूर्ण माहिती दिली. त्याला झालेली दुखापत ही गंभीर स्वरूपाचा असून व त्याला पुढील उपचारासाठी सबंधित रुग्णालयात दाखल करावयास सांगितले असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांचे सहकारी सहकारी प्रमोद सावंत ( जिल्हाप्रमुख शि. वै.म .क नवी मुंबई )यांस संपर्क केला व रुग्णास त्वरित नॅशनल बर्न हॉस्पिटल ऐरोली येथे बेडची व्यवस्था करून त्वरित उपचार चालू केले.त्याच्यावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया व उपचार चालु करून त्याला जिवाच्या धोक्यापासून बाहेर काढण्यात आले.मोलमजुरी करणाऱ्या अतिशय गरीब कुटुंबातील लकेश यांच्या आईवडिलांजवळ कमाईचा कोणताच मार्ग नसताना हॉस्पिटलचा सुमारे १५ ते २० लाख इतका खर्च (बिल )झाला असता हॉस्पिटल बिलामध्ये सवलत व निधी मिळवून देत तब्बल ३५ दिवस त्याच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले.हॉस्पिटलचे १५ ते २० लाखाचे बिल माफ झाले आहे. हॉस्पिटलचे त्याचे सर्व बिल माफ झाले आहे.मागील आठवड्यामध्ये त्याला सुखरुप घरी आणण्यात आले. सध्या त्याची पुर्णपणे तब्बेत ठीक असून तो आनंदी असल्याचा दिसून येतो.हे सर्व चैतन्य पाटील, डॉ.सुयश व प्रमोद सावंत यांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले असून चैतन्य पाटील हे लकेश याच्या तब्बेतीची विचारपूस करण्याकरिता गेले असताना त्याच्या आईने अतिशय भाऊक होऊन सर्वांचे आभार व्यक्त केले.