विरेगाव येथील महसूल अदालतीत नायब तहसीलदार विष्णू घुगे यांचे मार्गशन

गणेश शिंदे, विरेगाव दि.3
जालना तालुक्यातील विरेगाव येथील तलाठी सज्जा कार्यालयामध्ये रविवारी महसूल अदालत घेण्यात आली
यावेळी नायब तहसीलदार व्ही. एन.घुगे यांनी महसुल अदालती मध्ये तलाठी मंडळ अधिकारी यांना मार्गदर्शन केले. यात वारस फेरफार, तक्रारी फेर, खरेदी फेर निकाली काढण्यात आल्या असुन शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान २०२३ बाबत सूचना केल्या ज्या खातेदारांचे अनुदान प्रलंबित आहे. त्या शेतकऱ्यांनी केवायसी कराव्यात अनुदान मधील येणाऱ्या अडचणी शासनाच्या आदेशानुसार नव्याने सुरू झालेल्या एग्रीस्टॅक च्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सातबारा हा आधार कार्डशी जोडण्यात येणार आहे.
यावेळी मंडळ अधिकारी प्रसाद हजारे,संरपच पती सुरेश जाधव,ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे,तलाठी एन.जे. दहिवाळ, पी.डी ढाकरे, किरण गाढे उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालय भेट देऊन कामाचा आढावा घेतला यात रमाई घरकुल योजना १२, मोदी आवास घरकुल योजना ३०, यशवंतराव चव्हाण घरकुल योजना १०, एमआरजीएस अंतर्गत विहीर ५०, केंद्रस्तरीय पीएम आवास घरकुल योजना ७२, लाभार्थी काम सुरु असल्याचे संरपच सुरेश जाधव यांनी सांगीतले आहे.