आर्य वैश्य समाजाच्या वतीने दिव्यांचा,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांचा सत्कार.

नांदेड/ प्रतिनिधी,दि.2
नांदेड येथील प्रसिध्द कापड उद्योग व आर्य समाजाचे व नगरेश्वर बालक मंदिर प्राथमिक विद्यालय सराफा नांदेड चे अध्यक्ष मा.सुभाषराव कन्नावार व डेव्हलपमेंट प्लॉट उद्योगाचे व नगरेश्वर बालक मंदिर प्राथमिक विद्यालय बांधकाम समितीचे अध्यक्ष मा.जगन्नाथ चक्रवार, नगरेश्वर बालक मंदिर प्राथमिक विद्यालय मुख्याध्यापक सुनिल दाचावार , बांधकाम इंजिनिअर मा.लोकमनवार,यांच्या उपस्थितीत मा. सुभाषराव कन्नावार यांच्या निवासस्थानी दिव्यांग,वृध्द, निराधार व लाईव्ह चॉनल च्या माध्यमातून करित असलेल्या कार्याची ऑनलाईन बातमी कळाल्यावर मानवी दृष्टिकोनातून त्यांच्या कार्याची दखल घेऊन मा. संस्थेचे अध्यक्ष मा.सुभाषराव कन्नावार सरांनी फोनवर भेट देण्यास कळविल्या नंतर दिव्यांग, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांचा शाल श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगी आर्य वैश्य समाज व नगरेश्वर बालक मंदिर प्राथमिक विद्यालय सराफा नांदेड चे अध्यक्ष मा.सुभासराव कन्नावार, बांधकाम समितीचे अध्यक्ष मा.जगन्नाथराव चक्रवार ,
बांधकाम इंजिनिअर मा. लोकमनवार, शाळेचे मुख्याध्यापक, इत्यादी ऊपस्थित होते.