दिव्यांगाकाच्या तीन दिवसांपासून ऊपोषणात प्रशासकिय अधिकारी दखल घेतली नसल्यामुळे दिव्यांगाची प्रकृति बिघडली?
प्रशासन लक्ष देईल काय? चंपतराव डाकोरेचा सवाल
नांदेड/प्रतिनिधी, दि.17
मुखेड तालुक्यातील सकनुर ग्रामपंचायत कार्यालयासमोर दि.15 डिसे.2023 पासुन दिव्यांगानी ग्रामपंचायत मार्फत मिळणारा दिव्यांगाचा पाच टक्के निधी मिळावा म्हणुन अनेक वेळा ग्रामपंचायत सरपंच,ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांच्याकडे मांगनी करून ती निधीसाठी व अनेक सवलतीसाठी निवेदन, चर्चा,भेटी घेऊन प्रशासकिय अधिकारी यांच्याकडुन निवेदनाचे साधे ऊतर दिले जात नसल्यामुळे दिव्यांग बांधव खंडु व्यंकट गवते, माधव शंकर हैबते,अमरण ऊपोषण दि.15 डिसें.2023 पासुन अमरण ऊपोषण तिनं दिवसांपासुन चालु असलेल्या ऊपोषणात प्रशासकिय अधिकारी दखल घेतली नसल्यामुळे दिव्यांगाची प्रकृति बिघडली आता तरी प्रशासकिय अधिकारी लक्ष देऊन त्या दिव्यांगाना न्याय द्यावा म्हणुन दिव्यांग,वृध्द, निराधार,मित्र,मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी ग्रामसेवक यांना ऊपोषण संदर्भात लक्ष घालण्याचे सांगितले असता लक्ष दिले नसता प्रकृति दुसऱ्या दिवशी प्रकृति खालावली असता गावकऱ्यांनी 108 ला फोन केले असता दि.16 डिसें.2023 ला रात्री अकरा वाजता आरोग्य विभाग बाऱ्यहाळी चे पथक ऊपोषण स्थळि उपचार केले.
हि सर्व माहिती डाकोरेनी
,गटविकास अधिकारी मुखेड मोबाईलवर संपर्क करुन दिली तरी दि.17 डिसें.2023,ला दिली असता गटविकास अधिकाऱ्याचा फोन ग्रामसेवक उचलत नाही असे ऊतर गटविकास अधिकारी यांनी दिल्यानंतर दिव्यांगाचे ऊपोषण करणाऱ्याची प्रकृति दि.17 डिसे.2023 रोजी पाच वाजता बिघडली प्रशासकिय अधिकारी लक्ष देत नसल्याची माहितीह ऊपमुख्यकार्यकारी ग्रामपंचायत विभाग जि.प. नांदेडला फोन करून दिलि.
प्रशासकिय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरीत ऊपोषण संबंधित त्वरीत चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर दिव्यांग कायदा व दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे दोषीअधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी असे दिव्यांग,वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिली