बरडशेवाळा आरोग्य केंद्रात आयुष्मान भव मोहिमेचे उदघाटन

हदगाव/ प्रभाकर डुरके,दि.13
भारत सरकारच्या संकल्पनेतुन 2025 पर्यत भारत टि.बी.मुक्त करण्यासह विविध आजाराची उपचार करण्याच्या उद्देशाने तेरा सप्टेंबर रोजी आयुष्मान भव या राष्ट्रीय कार्यक्रमाचे राष्ट्रपती हस्ते या मोहिमेचे उदघाटन करून संबध भारतभरात आरोग्य विभागाच्या वतीने प्रत्येक आरोग्य केंद्रात तेरा सप्टेंबर या मोहिमेचे उदघाटन करण्यात आले.
नांदेड जिल्हा आरोग्य विभागाच्या आदेशानुसार हदगांव तालुक्यात बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय मुरमुरे यांच्या उपस्थीतीत या मोहिमेचे उदघाटन करण्यात आले.यावेळी परीसरात उभारलेल्या आयुष्मान गार्डन मध्ये वृक्ष लागवड करून आरोग्य केंद्रातील कुटुंब शस्त्रक्रिया केलेल्या महिलांचा सन्मान करुन कार्यक्षेत्राच्या वतीने आरोग्य केंद्रातील स्वच्छता व खडकाळ जमीनीवर वाचवलेल्या वृक्षाबद्ल आरोग्य केंद्रातील आरोग्य परीचर शेख इस्माईल व बापुराव थाटे यांचा गौरव करण्यात आला. या मोहिमेत आयुष्मान आपल्या दारी,स्वच्छता अभियान,आयुष्मान मेळावा,रक्तदान शिबीर ,अवयव दान शिबीर,आयुष्मान सभा होणार असून सेवा सप्ताह व सेवा यामध्ये अससर्गजन्य आजार सेवा, क्षयरोग कुष्ठरोग संसर्गजन्य, माता बाल आरोग्य पोषण सुविधा, सिकलसेल नेत्र रोगासह नाक कान घसा या विविध आजारावर तपासणी उपचार निदानाविषयी मार्गदर्शन करीत संसर्ग उद्देश व विविध आजारासह उपचार याविषयावर मार्गदर्शन करीत शासन राबवित असलेल्या या मोहिमकडे या राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रत्येकाने सहभाग घेऊन गरजेनुसार सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, मंडळ अधिकारी गोडबोले मॅडम , वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.बी.भिसे वैद्यकीय अधिकारी डॉ. के.सी.बरगे, सरपंच प्रतिनिधी मस्के,पोलीस पाटील दत्तात्रय मस्के,तलाठी बि.यु.ईप्पर, बिट जमादार श्याम वडजे, मुख्याध्यापक सुर्यवंशी, मुख्याध्यापक एम. एस.कदम. चिंचगव्हान माजी उपसरपंच इस्माईल पिंजारी.सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर दहिभाते,भगवान कदम,आरोग्य सहाय्यक स्वामी, आरोग्य सहाय्यक राठोड,आरोग्य सहाय्यीका एल.एम.वाघमारे मॅडम.आरोग्य सेवक बेलखेडे, आरोग्य सेविका काळसरे मॅडम, टेकाळे मॅडम,पडघणे मॅडम, कनिष्ठ सहाय्यक सुर्यवंशी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेवीका गावातील प्रतिष्ठित नागरिक रुग्ण नातेवाईक मंडळी उपस्थित होते.