ओबीसी समाजाच्या मागणीची दखल होईपर्यंत माघार घेणार नाही. – दत्तात्रय अनंतवार कवानकर
कवाना येथील उपोषणाचा तिसरा दिवस

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.24
मराठा समाजाला राज्य शासनाकडून वाटप केलेले ओबीसी प्रमाणपत्र रद्द करावेत या प्रमुख मागणीसह ओबीसी समाजाच्या विविध आरक्षण विषयक मागणीसाठी दत्तात्रय अंनतवार कवानकर यांना एल्गार पुकारत रविवार एकेवीस जुलै पासून कवाना ता.हदगांव येथे अमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील ओबीसी समाज बांधवानी भेट देऊन पाठींबा देत परीसरातील ओबीसी समाजाचे गावनिहाय भेटी ठरवुन दुसर्या दिवसापासून भेट देत आहेत. मंगळवार तेवीस जुलै रोजी उपोषणाचा तिसरा दिवस असुन उपोषणाला पाठींबा देण्यासाठी हदगांव तालुक्यासह आजुबाजुच्या तालुक्यातील ओबीसी समाज बांधव येत आहेत. उपोषणाच्या तिस-या दिवशी उपोषण स्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसुन आली.
उपोषण कर्ते दत्तात्रय अंनतवार यांच्याकडुन उपोषणा विषयी माहिती घेतली असता त्यांनी माझ्या उपोषणा विषयी तालुक्यासह बाहेरील तालुक्यातील ओबीसीच्या नेते मंडळी जमेल त्या पध्दतीने पाठिंबा देत आहेत. तर वरिष्ठ नेते मंडळीनी दूरध्वनीवरून संपर्क साधून पाठींबा देत आपण आपणास भेट देणार असल्याचे सांगत आहेत. माझ्या उपोषणाकडे लोकप्रतीनीधीसह शासनाने दुर्लक्ष होत असले तरी माझ्या मागणीची दखल होईपर्यंत मी माघार घेणार नसल्याचे त्यांनी सांगीतले. अंनतवार यांच्या तब्येतची बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.एस बी भिसे यांनी तपासणी केली.तर मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे उपनिरीक्षक भुषण कांबळे जमादार श्याम वडजे तलाठी बि.यु.ईप्पर उपोषणास भेट देऊन लक्ष ठेवून आहेत.