बरडशेवाळा येथील निकीता च्या विवाहाला लक्ष्मणराव कदम यांची सामाजिक बांधीलकी
कन्यादान साहित्याने भजने कुटुंब आंनदाने भारावले

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.1
दिवसेंदिवस विवाहासह विविध कार्यक्रमावर खर्च करण्याची चढाओढ होत असताना बघायला मिळत आहे. विवाह म्हटलाकी घराची सजावटीसह साहित्य खरेदीची कुटुंबासह नातेवाईक मित्र शेजारी मंडळीची झुंबड सुरु असते.पण त्यामध्ये काही कुटुंब असे आहेत की त्यांना उदरनिर्वाह चालवणेही मुश्किल होत असताना वाढत्या महागाईतील घरातील विवाह असो की विविध कार्यक्रम करताना अनेक अडचणीचा डोंगर उभा असतो.
धरणग्रस्त भजने कुटुंबाची परीस्थीती आपण कल्पनाही करु शकणार नाही अशी आहे. माधव रामा भजने मुळ कळमनुरी तालुक्यातील असून ईसापुर धरणामुळे बरडशेवाळा येथे गेल्या काही वर्षांपासून राहतात. उदरनिर्वाहास रोजमजुरीसाठी तब्बेत साथ देत नसल्याने शेळी राखणीचे हलके काम करतात. आईवडील वयोवृद्ध असल्याने कुटुंब चालवण्यासाठी पत्नी रोजमजुरी करते. मुलीचा विवाह तोंडावर आला असून कन्यादान साहित्य खरेदीसाठी आर्थिक परिस्थिती आड आल्याची बरडशेवाळा सामाजिक कार्यकर्ते वंसतराव चौधरी यांनी प्रभाकर दहिभाते यांना दिल्याने त्यांनी आपण आपले काम करत समाजासाठी काहीतरी देणे लागते या उदात्त हेतुने प्रेरित होऊन कार्य करण्या-यातील आपणही काही कुटुंबासाठी तयारी दाखवलेल्या रुई येथील शेतकरी कुटुंबातील सामाजिक कार्यकर्ता लक्ष्मणराव कदम पाटील रुईकर यांना माहिती दिल्याने त्यांनी कोणताही गाजावाजा न करता कन्यादान साहित्य घरपोच देत सामाजिक बांधीलकी जोपासली. घरी आलेले साहित्य बघुन भजने परीवाराच्या आंनदाला पारावार उरला नव्हता. कन्यादानाची चिंता लक्ष्मणराव कदम पाटील रुईकर यांनी मिटवली. पाच डिसेंबर रोजी होणा-या विवाहासाठी गरजेनुसार आणखी मदतीसाठी दानशूर मंडळीनी समोर येण्याचा यावेळी अनेकांनी मानस व्यक्त केला.
यावेळी सरपंच ञानेश्वर मस्के , ग्रामपंचायत सदस्य वंसतराव चौधरी , अवधूत चोंढेकर रुईकर , सामाजिक कार्यकर्त्यां सवीता निमडगे पळसेकर, यशवंत सेनेचे तालुका अध्यक्ष गंगाधर मस्के, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव मस्के पळसेकर ,सतीश वानखेडे रुईकर,अशोक करे विशाल शिरफुले यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्याची आवड असलेली मंडळी भजने परीवारासह शेजारील मंडळी उपस्थित होती.