श्री वाघेश्वर देवाच्या चित्रिकरण गीताचे दिमाखदार उद्घाटन.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.9
उरण तालुक्यातील पिरकोन गावचे जागृत ग्रामदैवत आणि परिसरातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान, हाकेला धावणाऱ्या श्री वाघेश्वर देवाच्या किर्तीचा महिमा रायगडभूषण किशोर दत्ताराम पाटील लेखक, दिग्दर्शक, कवी यांनी आपल्या स्वलिखित व स्वगायनाने सादरीकरण केलेल्या “घुंगूर बांधून काठीला वाघेश्वर देवानं” या गीतात मांडला असून या गिताच्या चित्रिकरणाचे उद्घाटन नुकतेच श्री वाघेश्वर मंदिराच्या सभागृहात जीवन गावंड माजी जि.प. सदस्य यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर गीताचे गीतकार व गायक रायगडभूषण किशोर पाटील यांचे कौतुक सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतात मांडून चित्रिकरणास शुभेच्छा दिल्या.
सदर प्रसंगी शिवशंकर नाट्य मंडळाचे संस्थापक शेखर पाटील, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ उरणचे अध्यक्ष हेमंत गावंड, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ उरणचे अध्यक्ष महेंद्र गावंड, कोरिओग्राफर अमृत म्हात्रे, शिवशंकर नाट्य मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गावंड,उपाध्यक्ष विठ्ठल गावंड, आम्ही पिरकोनकर समुहाचे अध्यक्ष आणि दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे सचिव चेतन गावंड, श्री वाघेश्वर देवस्थान आळीचे अध्यक्ष विशाल गावंड, सामाजिक कार्यकर्ते छगन गावंड, यशवंत पाटील, विनायक गावंड, नाट्यकलाकार एकनाथ म्हात्रे, गोपाळ म्हात्रे, विष्णू पाटील, नाट्य अभिनेत्री जोत्स्ना पाटील, मंडळाचे हितचिंतक, महिलावर्ग व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विलास गावंड यांनी केले.उपस्थितांचे आभार महेंद्र गावंड यांनी मानले.