भालेटेंभूर्णीत श्री.लक्ष्मी नृसिंह जयंती साजरी

टेंभुर्णी/सुनिल भाले,दि.4
श्री.राम सावळाराम देव यांच्या येथील नृसिंह मंदिरात आज नृसिंह जयंती साजरी करण्यात आली.चैञ पौर्णिमा ते वैशाख पौर्णिमा अश्या एक महीनाभर येथे रोज राञी वसंतपुजा,भजन व आरती असा उत्सव होतो.जाफ्राबाद तालुक्यातील हे एकमेव पुरातन असे नृसिंह मंदिर देव सर यांच्या घरात आहे .आज नृसिंह जन्मोत्सव कथा ह.भ.प. अशोक महाराज कुलकर्णी यांनी आपल्या मधुर वाणीतून सांगितली. यावेळी दयानंद दरबारचे विनायक गुरु,रवी महाराज राम देव,सागर देव,निरज देव,स्वप्नील देव ,प्रमोद खोत ,प्रदीप मुळे,धनंजय मुळे दिपक मुळे,अथर्व मुळे,नंदकुमार काळे,कीरणराव कुलकर्णी अतुल पाटोदकर ,कडूबा डोमळे ,मनोहर डोमळे,केदार शर्मा ,कल्पेश सोमाणी,विशाल गुरव,मोहीत नाईक यासह माता भगिणी सर्व जण उपस्थित होते.