मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध

जालना/प्रतिनिधी,दि.29
मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणीक पुरावे, महसूली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणी अंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी मा. न्यायमूर्ती (निवृत्त) संदीप शिंदे यांचे अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती.
त्यानुषंगाने जिल्हयातील 13 विभागातील अभिलेखाची तपासणी करणे बाबत संबंधीत विभागाचे विभागप्रमुख यांना कळविण्यात आले होते. त्यानुषंगाने उपरोक्त 13 विभागातील विभाग प्रमुख यांनी त्यांचे कडील उपलब्ध अभिलेखाची तपासणी करुन अहवाल सादर केले असता विविध विभागातील एकूण 3 हजार 318 नोंदी आढळून आल्या होत्या, सदरील नोंदी या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या jalna.nic.in आणि jalna.gov.in या वेबसाईटवर नांगरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
तसेच, नंतरच्या कालावधीत मा. समिती अध्यक्ष संदीप शिंदे (निवृत्त) व मा. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनी तपासणी सुरु ठेवणेबाबत दिलेल्या निर्देशानुसार वरील सर्व विभागाची पुनश्चय तपासणी करण्यात आली. सदरील फेरतपासणी मध्ये दुय्यम निबंधक कार्यालय जालना व भोकरदन यांच्या कार्यालयामध्ये एकूण 403 तसेच जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख यांच्या अधिनस्त कार्यालयामध्ये 688 इतक्या नोंदी आढळून आलेल्या आहेत. सदर नोंदी या त्यांच्या कार्यालयाचे नोटीस बोर्डवर तसेच गाव स्तरावर प्रसिध्द करण्यात आल्या असुन सदरील नोंदी वरील वेबसाईटवर प्रसिध्द करण्याची कार्यवाही सुरु आहे.
जिल्हयामध्ये एकूण 4 हजार 664 नोंदी आढळून आलेल्या असुन सदर नोंदीच्या अनुषंगाने जिल्हयामध्ये आतापर्यंत एकूण 6 हजार 220 इतके कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहेत, असे नि