महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश; दूषित सांडपाणी प्रक्रिये विरोधात कारवाईचे आदेश.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.16
उलवे नोड या सिडकोच्या प्रकल्पातील सर्व गृहनिर्माण संस्थांचे सांडपाणी यांचे एकत्रित प्रक्रिया करणेसाठी सेक्टर ६ येथे उलवे खाडी लगत बांधण्यात आलेला प्रकल्प हा फक्त १०% चालू असून त्यातील सर्व प्रक्रिया ही गेले कित्येक वर्षे बंद असून सदर प्रकल्पामुळे खाडी मध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून सेक्टर ६ च्या आजूबाजूला असणाऱ्या गृहसंकुले यांना दुर्गंधी आणि डासांचा सामना करावा लागत आहे.अनेक नागरिकांना डेंगू, मलेरिया रोगाची लागण सुद्धा झाली आहे.त्यामुळे दूषित सांडपाणी मुळे नागरिकांचे आरोग्य आता धोक्यात आले होते .या नागरिकांनी या समस्या विरोधात स्थानिक गावकरी आणि रहिवासी यांनी मनसेकडे गेले पाच महिन्यांपासून अनेक तक्रारी केल्या. त्या अनुषंगाने मनसेने आजवर जवळपास ६-७ वेळा या एसटीपी प्लांट ला भेट देऊन व सिडको अधिकाऱ्यांशी बोलून त्यात सुधारणा करण्यासंदर्भात वारंवार पाठपुरवठा केला पण तरीही त्यात कोणतीही सुधारणा आजतायगत झालेली नव्हती . त्यामुळे मनसे आक्रमक झाली. स्थानिक गावकरी व उलवे नोड रहिवासी यांना घेऊन मनसे तर्फे तीव्र “तिरडी उठाव ” आंदोलनाचा इशारा देताच महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाने सिडकोला सदर दूषित सांडपाणी संदर्भात व ठेकेदारा विरोधात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मनसेच्या पाठपुराव्याला आता यश आले आहे.
रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण सेना रायगड जिल्हा अध्यक्ष अभिजित घरत, पनवेल तालुका उपाध्यक्ष निर्दोष केशव गोंधळी, उलवे शहर अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष दशरथ मुंढे, गव्हाण विभाग अध्यक्ष आकाश श्रीकांत देशमुख, वहाळ विभाग उपाध्यक्ष राजेश परमेश्वर, गव्हाण विभाग उपाध्यक्ष
प्रितम तांडेल आदी पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक यांनी या समस्या बाबत सिडको प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे सात्यत्याने पाठपुरावा केला होता.
उलवे नोड सेक्टर ०६ मध्ये जे सिडकोने सांडपाणी प्रक्रीया केंद्र चालु केले आहे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १३/०८/२०२४ रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा कडे लेखी तक्रार करण्यात आली होती,त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सिडकोला सदर सांडपाणी प्रकिया केंद्राविरोधात नोटीस पाठवण्यात आली आहे.आता सिडको कडुन त्या सांडपाणी प्रकीया केंद्र चालवणाऱ्या कंत्राटदारावर काय कारवाई होते आणि या केंद्रातील त्रूटींमध्ये काय सुधारणा होतेय त्याच्या कडे उलवे नोड वासियांचे लक्ष लागले आहे .