pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

 माहेगाव येथील सरपंच यांचा दि.६ जुन 2023 रोजी अतिक्रमणाबदल झालेल्या चौकशी चा अहवाल चुकिचा

चुकिचा अहवाल सादर करणाऱ्या नायगाव पंचायत गटविकास अधिकारी ,विस्तार अधिकारी उप शाखा अभियंता यांना तात्काळ बडतर्फ करून सदरील प्रकरणाची फेर चौकशी करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते खाकेसाब बाबुराव चोपवाड यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

0 1 7 9 5 2

  नांदेड/चंपतराव पा. डाकोरे कुंचेलीकर,दि.6

नायगाव तालुक्यातील कार्ला (त.मा.)माहेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या संरपंच सौ.इंदरबाई खंडू फंताडे यांचे पती खंडू हाणमंता फंताडे यांच्या नावे असलेले घर हे नमुना नंबर वर असलेल्या जागे पेक्षा ज्यास्त जागा आहे ते अतिक्रमण केलेले आहे,व संरपंच यांनी सरपंच पदाचा गैरवापर करून घरकुल योजनेचा लाभ घेतलेला आहे,असा अर्ज सौ.सुवर्णा रामदास वडजे (ग्रा.पं.का.सदस्य कार्ला त.मा.माहेगाव ) यांनी संमधितांची चौकशी करून त्यांना सरपंच पदावरून अपात्र घोषित करण्यात यावे असा अर्ज दि.8/3/2023 रोजी अॅड कागडे यांच्या मार्फत मा.जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांचे न्यायालयात ग्रामपंचायत विवाद अर्ज दाखल केलेला होता.त्या अनुसंघाने मा.जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी दि.12/4/2023 रोजी पत्र काढून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 14 ( ज-3) व16 नुसार व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (ग ) 16 नुसार सदरील प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यात यावा आसे दोन पत्रमा.गटविकास अधिकारी पं.स.नायगाव यांना कळविण्यात आले त्या पत्राच्या अनुसंघाने दि.6/6/2023 रोजी सदरील प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नायगांव पं.स.कार्यालयाचे विस्तार अधिकारी कानोडे व उप अभियंता जिरवनकर हे जाऊन सदरील प्रकरणाची चौकशी
थातुर मातुर करून संमधितासी संघनमत करून चुकिचा अहवाल सादर करण्यात आला.त्यामुळे सदरील प्रकरणाची फेर चौकशी आपल्या स्तरावरून तात्काळ करण्यात यावे अन्यथा आपल्याच कार्यालयासमोर दि.5/7/2023 रोजी अमरण उपोषणास बसण्यात येईल असे निवेदन कार्ला त.मा.माहेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते खाकेसाब बाबुराव चोपवाड यांनी मा.जिल्हाधिकारी नांदेड यांना दि.20/6/2023 रोजी निवेदन देऊन त्या निवेदनाची प्रशासन गंभीर दखल न घेतल्यामुळे
सामाजिक कार्यकर्ते खाकेसाब बाबुराव चोपवाड यांचे दि.5 जुलै 2023 पासुन मा.जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आमरण उपोषणास बसले असुन उपोषणाला दुसरा दिवस असुन प्रशासन अद्याप दखल घेतली नसल्यामुळे न्याय मिळेपर्यंत उपोषण करण्याचा ठाम निर्णय ऊपोषण कर्त्यानी घेतला असे उपोषण कर्ता चोपवाड यांनी
आमच्या जिल्हाप्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 9 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे