pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

बीड ग्राहक तक्रार आयोगाचा चोलामंडल एम.एस.जनरल इन्शोरंन्स विमा कंपनीला दणका

वाहन नुकसान दुरुस्ती तसेच तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश

0 1 7 9 8 3

बीड/निशिकांत गोरे,दि.17

वाहन संरक्षण विमा उतरुनही त्याची पूर्ण रक्कम चोलामंडल एम.एस.जनरल इंन्शोरंन्स कंपनीने दिली नसल्याने या बाबत ग्राहक तक्रार आयोगाकडे धाव घेण्यात आली होती. आयोगाने सर्व रक्कम देण्याचे आदेश तक्रारीचा झालेला खर्च व मानसिक, आर्थिक झालेल्या त्रासापोटी झालेला खर्च सुध्दा द्यावा असे आदेश चोलामंडल एम.एस.जनरल इन्शोरंन्स विमा कंपनीला देण्यात आले आहेत.
या बाबत अधिक वृत्त असे की, अर्जदार ज्ञानेश्वर भागवत कुल्लाळ यांनी चोलामंडल एम.एस.जनरल इन्शोरंन्स विमा कंपनीकडे स्वत:च्या मालकीचे ट्रॅक्टर असून ते ट्रॅक्टरच्या व्यवसायातून मिळणार्‍या उत्पन्नातून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांनी सदरील कंपनीकडे वाहनाचा विमा वर्ग रुपये 11 हजार 889 रुपये भरुन विमा उतरविला होता. दि. 4/03/2021 रोजी तक्रारदार ट्रॅक्टरमधून वाहतुक करीत असतांना एका अज्ञात दहा चाकी वाहनाने ट्रॅक्टरला धडक दिल्याने वाहनाचे आतोनात नुकसान झाले होते. तक्रारदारांनी साईकृपा ट्रॅक्टरर्स शोरुम गेवराई येथून ट्रॅक्टर दुरुस्त करुन घेतले. त्या कामी तक्रारदारांना रुपये 80 हजार 354 रुपये एवढा खर्च आला. ज्ञानेश्वर कुल्लाळ यांनी वाहन दुरुस्ती खर्च मिळण्या करीता विमा कंपनीकडे अर्ज केला असता विमा कंपनीने दुरुस्ती कामी आलेला खर्च देण्यास नकार दिला होता. त्यामुळे तक्रारदारांनी वकीलांमार्फत कंपनीस नोटीस पाठवली होती. परंतु विमा कंपनीने तक्रारदारास रक्कम दिली नाही. त्यांनी बीड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण विभागाकडे तक्रार दाखल केली. सदरील तक्रारदाराच्यावतीने अ‍ॅड.गोविंद नवनाथराव शिराळे यांचा युक्तीवाद व दाखल पुरावा कागदपत्र यावरुन ग्राहक तक्रार निवारण बीड यांनी तक्रारदारास 30 दिवसाच्या आत वाहन दुरुस्ती, नुकसान खर्चापोटी रुक्कम 80 हजार 354 रुपये द्यावी अन्यथा सदर रक्कमेवर द.सा.द.शे.8 टक्के व्याज देय राहील, तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी 3 हजार रुपये, तक्रारीचा खर्च 2 हजार रुपये द्यावेत असा आदेश देण्यात आला आहे. तक्रारदारातर्फे अ‍ॅड.गोविंद नवनाथराव शिराळे, अ‍ॅड.सोनम कदम (शिराळे) यांनी काम पाहिले, व त्यांना अ‍ॅड.गिता वझे, अ‍ॅड.मिरा सवाई यांनी मोलाचे सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 9 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे