pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

छावा प्रतिष्ठान चिरनेर तर्फे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती चे आयोजन

0 1 7 9 3 6

 

उरण/विट्ठल ममताबादे,दि.9

तरुणांचे प्रेरणा स्थान,महाराष्ट्राचे दैवत स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची दी.१४ मे २०२३ रोजी जयंती असल्याने महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रमांनी ही जयंती साजरी केली जाते. उरण मधे चिरनेर येथील छावा प्रतिष्ठान चिरनेर तर्फे रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळ्याचे आयोजन रविवार दी.१४ मे २०२३रोजी श्री दत्त मंदिर, कातळपाडा चिरनेर, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे करण्यात आले आहे.

सकाळी ९ वाजता प्रतिमा पूजन,१० वाजता सत्यनारायणा ची महापूजा,दु.३:३० वा. छत्रपति संभाजी महाराज पालखी मिरवणूक सोहळा,संध्याकाळी ७:०० वा. महाप्रसाद,रात्री ९:०० वा. ऐतिहासिक मनोरंजनात्मक कार्यक्रम आदि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.ग्रामस्थ मंडळ – चिरनेर कातळपाडा, दुर्गामाता नवरात्रौत्सव -चिरनेर, नवतरूण मित्र मंडळ कातळपाडा, अध्यात्मिक पौर्णिमा मंडळ, चिरनेर-भोम, अंकुश इल्हेव्हन, अर्जुन इल्हेव्हन, नरेंद्र महाराज सांप्रदाय चिरनेर, अभिनव मित्र मंडळ, निखिल स्पोर्ट, मंजित स्पोर्ट, सहयाद्रि प्रतिष्ठाण, आकृती कलामंच चिरनेर, ओमसाई संवाद मंडळ – चिरनेर आदी विविध सामाजिक संस्था संघटनेचे मोलाचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभणार आहे.रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी संभाजी महाराजांची जयंती दरवर्षी उरण मध्ये साजरी केली जाते. त्यामुळे विविध जिल्ह्यातील नागरिक, भाविक भक्त, शिव भक्त श्री छत्रपती संभाजी महाराजांचे दर्शन घेउन नतमस्तक होतात.

 

या जयंती सोहळ्याला काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, माजी आमदार मनोहरशेठ भोईर,, वैजनाथ ठाकूर(जिल्हा परिषद सदस्य),उद्योजक एकनाथ पाटील (माऊलि कंपनी, जासई), रायगडभूषण राजू मुंबईकर ,इंटकचे रायगड जिल्हा अध्यक्ष किरीट पाटील,पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर मोकल, शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर,जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी,काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, तसेच विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिति लाभणार आहे तरी उरण मधील नागरिकांनी या जयंती सोहळ्याला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन या मंडळाचे संस्थापक – अध्यक्ष सुभाष कडु ,उपाध्यक्ष सुशिल म्हात्रे,उत्सव अध्यक्ष सचिन केणी ,खजीनदार माजी सैनीक सचिन कडू, कार्याध्यक्ष संतोष भोईर यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 9 3 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे