बदनापूर येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन
ट्रस्टच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर यांच्या
संकल्पनेतून जागतिक महिला दिनानिमित्त संस्थे अंतर्गत सुरु असलेल्या विविध शाखांतील कार्य करणार्या महिलांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
संस्थेच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत करणार्या महिलांचा गौरव व्हावा हा मानस बाळगून त्यांचा गौरव झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.देवेश पाथ्रीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव डॉ.एम.डी.पाथ्रीकर,संचालक डॉ.शेख
एस.एस.,डॉ.खान नाजमा, नोज लर्निंग अकॅडमीचे को. संस्थापक रिषभ लुणिया,प्रभारी प्राचार्य डॉ.झेड. ए.पठाण, डॉ. सुनील जायभाये हे उपस्थित
होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थचे मॅनेजमेंट कॉलेजचे संचालक डॉ.आबेद शेख यांनी केले तर सूत्रसंचलन कोमल बर्डिया यांनी केले.शेवटी
आभार मोनिका ईवरकर यांनी मानले. यावेळी प्रास्ताविकात डॉ.आबेद शेख म्हणाले की,संस्थेचे सचिव डॉ.एम. डी.पाथ्रीकर,अध्यक्ष डॉ.देवेश पाथ्रीकर
यांच्या संकल्पनेतून हा अभिनव कार्यक्रम या वर्षी सुरु करण्यात आला.महिला ही सदैव सत्कारास पात्र आहे. त्यांचा त्याग,औदार्य,मेहनत घर,कुटुंब
आणि समाज सांभाळून कार्य करत असतात असे विचार मांडले. प्रमुख पाहुण्यांच्या भाषणात प्रा.साखरे यांनी प्राचीन काळापासून महिलांचा विकास, कौटुंबिक, सामाजिक योगदान, कर्तृत्ववान महिलांचा इतिहास, चूल आणि मूल सांभाळत काम करत असताना तारेवरची कसरत करावी लागते असे विचार व्यक्त
केले.अध्यक्षीय भाषणात डॉ. देवेश पाथ्रीकर यांनी महिलांचा होणारा गौरव हा मातृशक्तिचा गौरव आहे, महिला ही केवळ घरच सांभाळत नाही तर देशाच्या
विकासासाठी सदैव तत्पर असते. देशातील महिला ह्या देशाला उंचावर नेण्यासाठी मोलाची कामगिरी बजावत असतात ,आज महिला कोणत्याही क्षेत्रात
कमी नाहीत. महाविद्यालयाच्या विकासात देखील अनेक महिला भगिनींचे मोलाचे सहकार्य लाभत आहे असे विचार व्यक्त केले. यावेळी डॉ.राहुल हजारे,इंग्रजी
शाळेच्या मुख्यध्यापिका निशिगंधा देशमुख,व बहुसंख्येने प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल
सपकाळ पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात संस्थांतर्गत विविध महाविद्यालय,शाळा मध्ये कार्यरत महिला कर्मचार्यांचा स्कार्प,टोपी देऊन
सत्कार करण्यात आला तर रोजंदारी काम करणार्या महिलाना साड्या देऊन सत्कार करण्यात आला.