pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

18-जालना लोकसभा मतदारसंघ मतदान शांततेत पार पाडण्यासाठी दक्षता घ्यावी — अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी

0 1 7 9 2 4

जालना/प्रतिनिधी,दि.11

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत जालना लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार, दिनांक 13 मे रोजी होणारे मतदान निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. मतदानाशी निगडीत सर्व अहवाल वेळेवर उपलब्ध करुन द्यावेत. मतदान काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सतर्क राहावे, अशी सूचना अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवनात आयोजित लोकसभा निवडणूक पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत डॉ. कुलकर्णी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.

श्री. कुलकर्णी म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेत मतदान हा महत्त्वाचा भाग आहे. मतदानाच्या वेळी मतदारांना कुठल्याही प्रकारे समस्या जाणवू नयेत, यासाठी अतिशय सुयोग्य पध्दतीने नियोजन करुन मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे. याकरीता मतदान प्रक्रियेशी संबंधित सर्व यंत्रणेने दक्षता घ्यावी. मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. वृध्द, दिव्यांग यांची मतदानाच्या वेळी काळजी घ्यावी, त्यांना विनात्रास मतदान करता यावे, याची दक्षता घ्यावी. संवेदनशील मतदान केंद्रांकडे विशेष लक्ष द्यावे.  मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महत्त्वाचे अहवाल वेळेवर पाठवावेत. मतदान प्रक्रियेत अडथळा आल्यास त्याचे तात्काळ निराकरण करावे. मतदान झाल्यानंतर मतदान यंत्र सुरक्षितपणे स्टाँगरुमध्ये जमा करावीत. तसेच मतमोजणीची प्रक्रियादेखील अतिशय काळजीपूर्वक पार पाडावी. केलेल्या सुक्ष्म नियोजनानुसार मतमोजणी व्यवस्थित करावी. मतमोजणी केंद्रावर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध असाव्यात. विशेषत: त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असावा. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाने राबविलेल्या जनजागृतीपर उपक्रमांचे डॉ. कुलकर्णी यांनी यावेळी कौतुक केले.

प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जालना लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती सादरीकरणाव्दारे दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 9 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे