pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राज्य उत्पादन शुल्क विभागाची ‘थर्टी फर्स्ट’ च्या पार्ट्यावर राहणार नजर

0 1 7 8 7 8

जालना/प्रतिनिधी,दि.28

राज्य उत्पादन शुल्क विभागाची ‘थर्टी फर्स्ट’ च्या पार्ट्यावर राहणार नजर राहणार असून 1 जानेवारी रोजी पहाटे 1 वाजेपर्यंत मद्यविक्री राहणार सुरु आहेत. ‘थर्टी फर्स्ट’ च्या पार्श्वभुमीवर, महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अन्वये जालना शहरातील सर्व प्रकारच्या अनुज्ञप्त्या 1 जानेवारी रोजी पहाटे 1 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तरी जालना जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या देशी व विदेशी मद्य अनुज्ञप्त्या 1 जानेवारी रोजी पहाटे 1 वाजेपर्यंत राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.
पोलिस विभागाशी समन्वय ठेवून राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस विभाग जालना यांच्या संयुक्त मोहिम देखील या काळात घेण्यात येणार आहेत. अवैध मद्यविक्री व निर्मितीवर नजर ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क, जालना यांचे पथक सज्ज करण्यात आले आहे. मद्य विक्रीसाठी अधिकृत परवान्याची गरज असते. त्याचप्रमाणे मद्य खरेदीसाठी / पिण्यासाठीही परवाना घ्यावा लागतो व हा परवाना ऑनलाईन घेता येतो. 1 दिवस, एक वर्ष आणि आजीवन असे तीन प्रकारचे परवाने घेता येतात. एक दिवसासाठी देशी मद्याचा दोन रुपये आणि विदेशी मद्याचा पाच रुपये शासन शुल्क भरुन परवाना घेता येतो. तसेच एक वर्षासाठी 100 रुपये आणि आजीवन परवान्यासाठी 1 हजार रुपये शासन शुल्क भरुन मद्य पिण्याचा परवाना घेता येतो.
राज्य उत्पादन शुल्क, जालना विभागाची 1 जानेवारी 2023 ते 26 डिसेंबर 2023 पर्यंत एकुण 890 गुन्हे नोंद करण्यात आले असुन 595 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये रु.95 लाख 39 हजार 641 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन 32 वाहनांचा समावेश आहे. डिसेंबरमध्ये 72 गुन्हे 58 अटकेत तर 26 तारखेपर्यंत अवैध दारु धंद्या प्रकरणी 72 गुन्हे दाखल केले. यात 58 जणांना अटक करण्यात आली तर 12.73 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वर्षभरात 595 अटकेत तर वर्षभरात धडक कारवाई करत 890 गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यामध्ये एकुण 595 आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांमध्ये एकुण 32 वाहने जप्त करण्यात आली आहेत. अवैध दारुधंद्या संदर्भात 18002339999 या टोल फ्री कमांकावरुन किंवा 9284617614 या व्हॉट्सअॅप क्रमांकावरुनही तक्रार दाखल करता येते.
थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने परवानगी न घेता हॉटेल्स किंवा बाहेरच्या भागात होणाऱ्या मद्यांच्या पार्ट्यावरही उत्पादन शुल्कच्या येथील विभागाची करडी नजर राहणार आहे. फार्म हाऊस किंवा अन्य बाहेरच्या ठिकाणी पार्टी करावयाची असल्यास उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. अन्यथा महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 अंतर्गत 68 व 84 कलमांतर्गत 25 हजारपर्यंत दंड होणार आहे. जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत असून उद्योजकांनी एक दिवसीय (क्लब) परवाना घेवुनच पार्टी आयोजित करावी. असे आवाहनही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.

——————————————————————-
31 डिसेंबर कालावधीत शासनाने दारु विक्री करणाऱ्या दुकानांना वेळ वाढवुन दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ जालना जिल्ह्यातील सर्व देशी व विदेशी किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या 1 जानेवारी 2024 राजी पहाटे 1 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश आहेत. जिल्ह्यात अवैध दारु विक्री होणार नाही किंवा बाहेरुनही येणार नाही, यासाठी उत्पादन शुल्काकडुन दक्षता घेतली जाणार आहे. त्याकरीता अंबड, जालना व भोकरदन या तीन कार्यक्षत्रामध्ये पथके तैनात केली आहेत. हानिकारक हातभट्टया उध्दवस्त करण्याच्या दृष्टीने धडक कारवाई केली जात आहे. – डॉ. पराग नवलकर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जालना

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 8 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे