महिला रोजगार मेळाव्यातून 91 महिलांची प्राथमिक निवड
जालना/प्रतिनिधी,दि.24
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना व मॉडेल करिअर सेंटर, जालना आणि श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालय, समाजशास्त्र विभाग, जालना यांचे संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 24 जानेवारी, 2024 रोजी श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालय, जालना. येथे महिलासाठी विशेष पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात एकुण 134 महिला उमेदवारांनी सहभाग नोंदविला असून 134 उमेदवारांनी विविध उद्योजकांकडे मुलाखती दिल्या यात 91 महिला उमेदवारांची विविध आस्थापनांनी प्राथमिक निवड केली आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त भुजंग रिठे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या मार्फत 24 जानेवारी, 2024 रोजी बेरोजगार महिलासाठी जालना येथील श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालय, मध्ये ” महिलासाठी विशेष पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष महेंद्रकुमार गुप्ता व संस्थेचे सचिव मुकेश आग्रवाल यांच्या हस्ते झाले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन लाभलेल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती प्रणिता भारसाकडे -वाघ यांनी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त भुजंग रिठे यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीमती जयश्री वाडेकर यांनी करुन आभार सुरेश बहुरे यांनी मानले. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.