pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

स्ट्राँगरूम व मतमोजणी केंद्र उभारणी करतेवेळी संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी       -निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी सोहम वायाळ

0 1 7 7 8 1

जालना/प्रतिनिधी,दि.30

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने स्ट्राँगरूम व मतमोजणी केंद्र उभारणी करत असतांना संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य स्टाँगरूम व मतमोजणी केंद्राचे नोडल अधिकारी सोहम वायाळ यांनी दिले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मुख्य स्टाँगरूम व मतमोजणी केंद्र उभारणी पुर्व तयारीच्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी, मुख्य स्टाँगरूम व मतमोजणी केंद्र उभारणी जालना यांचे अध्यक्षतेखाली दि. 29 एप्रिल 2024 रोजी दुपारी 1  वाजता बैठक पार पडली.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वायाळ  यांनी स्टाँगरूम व मतमोजणी केंद्र उभारणी करणेच्या दृष्टीकोनातून करावयाच्या कार्यवाहीबाबत मुद्दनिहाय सविस्तर माहिती सांगून स्ट्रॉंगरूम व मतमोजणी उभारणी करावयाच्या उपाययोजनाबाबत. कार्यकारी अभियंता-1 सा.बा. विभाग व मनपा आयुक्त यांना सुचना देण्यात आल्या. तसेच 18-जालना लोकसभा मतदार संघातील 6 विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी करीता विविध टेबलनिहाय उभारणी करणे, स्ट्रॉग रूमला डबल लॉक लावणे, पार्किंग व्यवस्था करणे अग्निशामक वाहनांची व्यवस्था करणे व इतर सुविधा पुरवणे बाबत सुचना देण्यात आल्या. तसेच कॉम्प्युटर कॉन्ट्रॅक्टर यांना जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी यांचे सुचने प्रमाणे मतमोजणी कामी कॉम्प्युटर योग्य प्रमाणे लावणे व तसेच सीसीटिव्ही लावण्याबाबत सुचना देण्यात आल्या. तसेच इंटरनेट सेवा, दुरध्वनी सेवा निर्मान करणे बाबत सुचना देण्यात आल्या. तसेच कार्यकारी अभियंता ईलेक्ट्रीक सा.बा. विभाग यांना अखंडीत विज पुरवठा करणेसाठी करणे बाबत सुचना देण्यात आल्या. तसेच जिल्हा खनीकर्म अधिकारी यांना मतदान केंद्रनिहाय स्टिकर तयार करून स्टिकर मतदान केंद्रनिहाय लावण्याबाबत सुचना देण्यात आल्या. मंडप कॉन्ट्रॅक्टर यांना स्ट्राँगरूमची उभारणी व मतमोजणी उभारणीसाठी लागनारे सर्व साहीत्या वेळेवर उपलब्ध करून देण्याबाबत तसेच जनरेटर, टेबल खुर्च्छा उपलब्ध करून देण्या बाबत सुचना देण्यात आल्या. तसेच बालकामगार अधिकारी यांना 10×10 आकाराचे एक चौकशी कक्ष स्थापन करून स्ट्रॉगरूम दर्शवणारा नकाशा तयार करून समोर ठेवण्याबाबत सुचना देण्यात आल्या.
तसेच मनपा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस विभाग, बालकामगार विभाग, खनिकर्म विभाग, मंडळ अधिकारी, तलाठी अधिकारी-कर्मचारी व मंडप कॉन्ट्रॅक्टर, कॉम्पुटर कॉन्ट्रॅक्टर यांचा सविस्तर आढावा घेवून त्यांना आपल्याशी निगडीत असणा-या कामाबाबत सविस्तर असे मार्गदर्शन करून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशानूसार मतमोजणी केंद्राची उभारणी करण्याची सुचना करण्यात आली.  या  बैठकीस जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी, जिल्हा खनीकर्म अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, बालकामगार अधिकारी, मनपा अधिकारी, पोलिस विभाग, मंडळ अधिकारी, तलाठी, मंडप कॉन्ट्रॅक्टर, कॉम्पुटर कॉन्ट्रॅक्टर, यांचे प्रतिनिधी तसेच दि. 22 एप्रिल 2024 रोजीच्या 18-जालना लोकसभा निवडणूक स्ट्राँगरूम व मतमोजणी उभारणी केंद्र आदेशातील नियुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे