pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

18-जालना लोकसभा मतदारसंघ जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची माध्यम कक्षाला भेट

0 1 7 7 7 1

जालना/प्रतिनिधी,दि.25

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी बुधवारी (दि. 24) जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मिडिया कक्षाला भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.  जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांनी यावेळी माध्यम कक्ष व माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमार्फत करण्यात येणाऱ्या कामाची माहिती दिली. राजकीय जाहिरातीचे प्रमाणीकरण करणे, उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या दृष्टीकोनातून मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक्स, सोशल माध्यमांवरील जाहिरातींवर लक्ष ठेवणे तसेच पेडन्यूजवर लक्ष ठेवणे. निवडणूक आचारसंहिता कालावधीत मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसिध्द होणारे वृत्त जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देणे, उमेदवारांचा दैनंदिन निवडणूक जाहिरातींचा खर्च अहवाल तयार करणे, माध्यमांना निवडणूक विषयक वृत्ताकंन पाठविणे, पत्रकार परिषदांचे आयोजन करणे आदी कामे माध्यम कक्षामार्फत केली जात असल्याचे श्री. धोंगडे यांनी यावेळी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे