pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

ओबीसीच्या कोकण विभागीय आढावा बैठकीत भानुदास माळी यांनी केला भाजपवर जोरदार प्रहार.

पत्रकार परिषदेतून आढावा बैठकी विषयी दिली माहिती.

0 1 7 7 8 0

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.4

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे प्रांताध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या सुचने नुसार भानुदासजी माळी- प्रदेश अध्यक्ष ओ.बी.सी. विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हे ओ बी सी विभागाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेण्या करिता महाराष्ट्र विभागीय दौरा चालु केला असुन कोकण विभागीय आढावा बैठक दि.०४/०८/२०२३ शुक्रवार रोजी रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील उलवे नोड समाज मंदिर शेलघर येथे कोकण विभागीय अध्यक्ष श्री शंभो म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.कोकण विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष व प्रदेश पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या आढावा बैठकीत संघटनात्मक दिशा व पुढील ध्येय धोरणे ठरविण्यात आले.

शेलघर येथील कोकण विभागीय ओबीसी आढावा बैठक प्रसंगी भानुदास माळी अध्यक्ष- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबिसी विभाग, दिगंबर राऊत (अ.भा. काँ.क.स.स), शैलेश राऊत (प्रसिध्दी प्रमुख), धनराज राठोड (सरचिटणीस),कोकण विभाग अध्यक्ष -शंभो म्हात्रे, प्रदेश सरचिटणीस -बाळाराम वास्कर,तसेच प्रदेश पदाधीकारी दिपक राऊत (उपाध्यक्ष), युवराज खरात (कार्यालय प्रमुख), प्रविण आचरेकर (सचिव),भोलाशेठ पाटील धनाजीशेठ गोंधळी (उलवे चिटणीस),जिल्हाअध्यक्ष- वैभव पाटील (पनवेल),रायगड जिल्हा उपाध्यक्ष -शैलेश पाटणे,, विभावरी सुखी (संघटक), जिवेश विशे (सचिव),डॉ विनोद पाटील (सचिव) उमेश भोईर (रायगड)महादेव चव्हाण (रत्नागिरी),संतोष सुतार (नवी मुंबई),राहुल पिंगळे (ठाणे), तुषार देसाले ,जयदीप सानप (कल्याण),प्रमुख पाहुणे म्हणून महेंद्रशेठ घरत (रायगड जिल्हा अध्यक्ष), मिलिंद पाडगावकर (वरिष्ट उपाध्यक्ष)कु. श्रुतीताई म्हात्रे (कार्याध्यक्ष पनवेल), ,महिला पदाधिकारी- अमिदी मेस्त्री, विभावरी सुखी,निर्मला म्हात्रे,रेखा घरत,निता शॅनाय,रेखा जाधव आदि कोकण विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाअंतर्गत कोकण विभागीय आढावा बैठक शेलघर येथे संपन्न झाला. यावेळी पत्रकार परिषद घेण्यात आली.पत्रकार परिषदेत भानुदास माळी यांनी भाजपच्या ध्येय धोरणावर जोरदार प्रहार केला. व भाजप जे काही षडयंत्र राबवत आहे. गलिच्छ राजकारण करत आहे त्याचा निषेध केला.आढावा बैठकीत काही ठराव मांडण्यात आले. तसेच काही विषयावर महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तर काही मागण्या सुद्धा आढावा बैठकीतून पुढे आल्या.

 

ओबीसी लोकांसाठी स्थानीक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभा या साठी ३५% आरक्षण देण्यात यावे व तसे घाटनात्मक आरक्षण देण्यास आम्ही मागणी करीत आहोत.एआयसीसी यांनी रायपूर अधिवेशनामध्ये ५०% आरक्षण गावपातळीपासून ते एआयसीसी मध्ये ओबीसी ,एससी , एसटी अल्पसंख्यांक यांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल एआयसीसीचे जाहिर आभार मानत आहोत.असे सांगत भानुदास माळी यांनी पत्रकार परिषदेतून शासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत त्यामध्ये संपूर्ण देशामध्ये जातनिहाय जनगणना करणे व ओबीसी साठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून निधी उपलब्ध करून देणे यासाठी राज्यशासनाने तरतूद करावी.प्रत्येक जिल्हयात ओबीसी साठी स्वतंत्र वस्तीगृह निर्माण करावे व ते चालविणेसाठी ओबीसी मधील सुशिक्षित बेकार लोकांना चालू करण्यास परवानगी दयावी.महाज्योती ही ओबीसी साठी चालू केलेली वित्तिय संस्था आहे. परंतु त्यासाठी पुणे, नाशिक, आमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, रायगड या ठिकाणी त्वरीत विभागीय कार्यालय चालू करण्यात यावे. व परदेशी शिक्षणासाठी व इतर महत्वाच्या शैक्षणिक डिग्रीसाठी भरीव निधीची तरतूद करावी.ओबीसी साठी व बलुतेदारांसाठी विविध महामंडळे स्थापन केले आहे. परंतु त्यांना पुरेसा निधी व पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे योजनांची अंमलबजावणी होत नाही. तसेच प्रत्येक महामंडळासाठी २५००/- कोटी रूपयाची तरतूद करून पुर्वीची जे कर्ज काढली आहेत ती पुर्णपणे माफ करून कोर्टातील केसेस काढून घ्याव्यात. मागसवर्गीय विदयार्थ्यांसाठी स्वाधार योजना आहे. त्यापध्दतीची ओबीसी साठी स्वः धार योजना त्वरीत चालू करण्यात यावे. भारतरत्न किताब / आण्णा भाऊ साठे / महात्मा फुले / सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न किताब मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात यावी.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओ.बी.सी विभागामार्फत संघटना बळकटीसाठी लोकसभा व विधानसभेसाठी स्वतंत्र कोऑर्डिनेटर नेमणेचा निर्णय घेतला आहे.श्री. संभाजी भिडे या विकृत माणसाला महात्मा गांधी, महात्मा फुले, श्री. संत साईंबाबा यांचेवर अत्यंत खालच्या दर्जाची वक्तव्य केली आहेत, त्यामुळे त्यांना १५ दिवसाच्या आत त्वरित अटक करून देशद्रोहाचा खटला दाखल करावा.अन्यथा काँग्रेस तर्फे राज्यभर सर्वत्र आंदोलन करण्यात येईल.अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यामध्ये पार्लिमेंट्री बोर्डामध्ये ओ.बी.सी प्रदेश कार्यालयाकडून सुचवण्यात आलेल्या लोकांना पार्लिमेंट्री बोर्डामध्ये घेण्यात यावे.राष्ट्रपती महोदयांना सादर करणेत आलेला रोहिणी आयोग हा ओ.बी.सी. च्यामध्ये फूट पाडणारा असून तो लागू केल्यास संबंध देशामध्ये ओ.बी.सी च्या मध्ये फार मोठे भांडणे लागणार आहेत. तरी तो लागू करण्यात येऊ नये. तसे झाल्यास ओबीसी काँग्रेस कमिटी महाराष्ट्र आणि देशभर आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही.महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी ओबीसीची खोटे दाखले घेवून ओ.बी.सींच्या सर्व सवलती हडप करणाऱ्या खोटे ओ.बी.सी दाखले घेणाऱ्यांवर मोका अंतर्गत कायदेशीर गुन्हा दाखल करणेत यावा.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे असा सर्वप्रथम ठराव काँग्रेसने मांडला होता. सर्वात अगोदर मागणी काँग्रेसने केली होती त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते, माजी खासदार दि. बा. पाटील साहेब यांचे नाव देण्यात यावे.केंद्र सरकार यात राजकारण करत आहे. जर केंद्र सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव नाही दिले तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.आदी विविध मागण्यांचा समावेश आहे. या सर्व मागण्या मान्य झाल्या नाहीत तर काँग्रेसच्या ओबीसी विभागातर्फे केंद्र प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग महाराष्ट्र अध्यक्ष भानुदास माळी यांनी दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे