pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सोशल अँड डिझास्टर मॅनेजमेंट असोसिएशनचा सातवा वर्धापन दिन खोपटे गावात साजरा

0 1 7 7 8 0

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.24

दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी सोशल अँड डिझास्टर मॅनेजमेंट अवेअरनेस असोसिएशन या संस्थेचा वर्धापन दिन उरण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत खोपटे बांधपाडा या ठिकाणी साजरा करण्यात आला.प्रसंगी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका भारती म्हात्रे, संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम गोंधळी, उपाध्यक्ष गोपाळ म्हात्रे, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, सेक्रेटरी राकेश म्हात्रे, सहसेक्रेटरी समाधान कडू, खजिनदार इन्कार पाटील त्याचप्रमाणे सल्लागार नामदेव ठाकूर व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.संस्थेची माहिती कार्याध्यक्ष अनिकेत पाटील यांनी खूप छान पद्धतीने दिली ज्यामुळे मुलांना आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करण्याची इच्छा व आपत्ती व्यवस्थापनाचा प्रशिक्षण घेण्याची इच्छा मनात जागृत झाली.गावातील महिला व शालेय विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. संस्था नोंदणी झाल्यापासून बऱ्याच मोठ्या आपत्तीवर व छोट्या घटना दुर्घटनांवरती ही संघटना काम करत आहे. कोल्हापूरला आलेला पूर, सांगलीला आलेला पूर, निसर्ग चक्रीवादळ, त्वाक्ते चक्रीवादळ,महाड पूर , तळीये वाडी भूसखलन, इरशालवाडी भूसखलन , त्याचप्रमाणे २०२३ साली अतिवृष्टी दरम्यान संस्थेच्या स्वयंसेवकांनी आपापल्या गावा ठिकाणी लोकांचं जीव वाचवण्याचे काम व लोकांपर्यंत पूर परिस्थितीची माहिती पोहोचवण्याचं काम केले.सध्या संस्था आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्याचं काम करत आहे त्या अनुषंगाने अलिबाग तालुक्यामध्ये प्रशिक्षण संस्था देत आहे.सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या स्वयंसेवकांपैकी ज्यांनी २०२३ सालामध्ये घडलेल्या घटनांमध्ये खारघर उष्माघात व चेंगराचींगरी, इरशालवाडी भूसखलन त्याचप्रमाणे अतिवृष्टी दरम्यान आपल्या गावामध्ये लोकांची निस्वार्थ भावनेने मदत केली होती, व जे स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यामध्ये संस्थेच्या प्रशिक्षकांना मदत करत आहेत अशा निवडक स्वयंसेवकांचा यावेळी प्रमाणपत्र, ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन कु. शब्दश्री गणपत भेरले, कु. साक्षी गणेश नाईक,अजित शशिकांत मोकल, कु.अनिकेत चौगुले, कु. पूनम दहीतुळे, कु.वेदिका भूषण भोईर, कु.ज्योती सहानी व कु.ममता गुप्ता यांचा सत्कार करण्यात आला. भारती मॅडम यांनी जीव वाचवणारा व्यक्ती कसा मोठा असतो हे त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून उपस्थितांना सांगितले.संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम गोंधळी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व त्यांच्या जीवनातील काही घटना या कार्यक्रमा निमित्त सांगितले कार्यक्रमाचे शेवट राकेश म्हात्रे यांनी सर्वांचे आभार मानून केले.एकंदरीत सोशल अँड डिझास्टर मॅनेजमेंट असोसिएशनचा सातवा वर्धापन दिन खोपटे गावात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे