pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

ओबीसी समाजाने आगामी निवडणुकीत मतपेटीच्या माध्यमातून क्रांती घडवावी – प्रा. लक्ष्मण हाके

0 1 7 7 7 4
जालना/प्रतिनीधी,दि.10
असंघटीत असलेल्या ओबीसी व भटक्या विमुक्त जात समुह देशाच्या स्वातंत्र्यानंतरही सामाजिक न्यायासाठी  प्रतीक्षा करावी लागत आहे.या समूहातील बांधवांचा केवळ मतांसाठी वापर करण्यात आला असून प्रस्थापित लोकं हे फक्त मतपेटीला घाबरतात.आगामी निवडणुकीत मतपेटीच्या माध्यमातून क्रांती घडवून आणावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य राजकीय सत्ता परिवर्तन  हाच जात समुह करू मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्रा.लक्ष्मण हाके यांनी आज रविवारी येथे बोलतांना केले.
जालना शहरातील जुना जालना भागात असलेल्या वैष्णवी व्यापारी संकुलात आज रविवारी सकल ओबीसी समाजाच्या पहिल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रा.लक्ष्मण हाके यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर मुक्तेश्वर मंदिर परिसरात असलेल्या आयेशा लॉन्स मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी जनजागृती मेळाव्यात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी आ.राजेश राठोड हे होते.यावेळी पुढे बोलतांना प्रा.हाके म्हणाले की,आज देशात झालेल्या राजकीय सत्तांतरामुळे देशातील सामाजिक,धार्मिक वातावरण गढूळ झाले आहे.देशातील संविधान,लोकशाही धोक्यात आली असून नागरिकांच्या हक्क व अधिकारावर गदा आणली जात आहे.सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या मंडळींचा आवाज दाबला जात आहे, त्यांच्या विरोधात इडी, सीबीआयच्या चौकशींचा ससेमिरा लावला जात आहे. पंचायत राजमधील ५६ हजार जागा रिक्त झालेल्या आहेत. सातासमुद्रापलिकडून आलेल्या इंग्रजांनी भारतात जातीनिहाय जनगणना सुरू केली होती.आता ही जनगणनाही थांबली आहे. महाराष्ट्र राज्यात ६० टक्के लोकसंख्या असलेला ओबीसी व भटका विमुक्त जात समुह हा स्वातंत्र्यानंतरही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. प्रस्थापित समाज व्यवस्थेने  मतदानापुरताच गृहीत धरलेल्या ओबीसी समाजाच्या हातात कुठल्याही आर्थिक नाड्या नाहीत.हा समाज घटक कुठल्याही न्याय्य प्रक्रियेत नाही. पुरोगामी महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाजाच्या कल्याणासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात केवळ ०.४ ते ०.५ टक्के आर्थिक तरतूद करण्यात येते ही या पुरोग्रामी महाराष्ट्राची शोकांतिका असल्याची टीका प्रा.हाके यांनी यावेळी केली.       देशातील अस्थिरतेमुळे तसेच ओबीसींच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे,आता ओबीसी समुह घटकावर आपली उपद्रव मुल्ये सांगण्याची वेळ आली असून ओबीसी तसेच भटक्या विमुक्त जात समुहाने संघटीत होवून गावगाड्यातील छोट्या जात समुहालाही संघटीत करून घ्यावे लागणार आहे. सत्ताधारी मंडळींनी जसे निवडणुकीचे व्याकरण आत्मसात केले आहे, तसेच ओबीसी व भटक्या जात समुहाने लोकसभा, विधानसभेत आपले अधिकचे प्रतिनिधी कसे जातील,यासाठी पुढे यावे,राजकीय पक्षाकडून ओबीसी समाजाला निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार का ? असा सवाल विचारला पाहिजे. लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी ओबीसी,भटक्या विमुक्त जात समुहाने जागे व्हावे, लोकसभा निवडणुकांमध्ये सत्ता परिवर्तन करण्याची संधी या जात समुहाला प्राप्त झाली असून त्यासाठी संघटीत व्हावे,असे आवाहनही प्रा.हाके यांनी यावेळी केले.अध्यक्षीय समारोप करतांना  विधान परिषद सदस्य राजेश राठोड म्हणाले की,जालना जिल्ह्यात ओबीसी व भटक्या विमुक्त जात समुहाची चळवळ जोरदारपणे सुरू असून हा जात समुह ताकदीने पुढे येत आहे. आपण ओबीसी व भटक्या विमुक्त जात समुहाच्या लढ्यासाठी सतत लढत राहणार असून यासाठी आपली आमदारकी पणाला लावू,असेही ते म्हणाले.कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करतांना जालना सकल ओबीसी समाजाचे जिल्हा समन्वयक अशोक पांगारकर म्हणाले की,जालना हे ओबीसी चळवळीचे केंद्र आहे.पक्षीय जोडे बाहेर काढून आम्ही ओबीसी, भटक्या विमुक्त जात समुहाला संघटीत करण्याचा प्रयत्न करत आहोत.मराठा समाज आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली ओबीसी समाज घटकांना भयभीत करण्याचे प्रयत्न झाले आहेत.ओबीसींचा मराठा समाज आरक्षणाला कुठलाही विरोध नाही,ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये, हीच आमची भूमिका आहे.भयभीत झालेला गाव गाड्यातील ओबीसी व भटक्या विमुक्त जात समुहाला संघटीत करून धाडसी पाऊल उचलण्याची गरज आहे असे सांगून पांगारकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत मागासवर्गीय,मुस्लिम व ओबीसी जात समुहाने एकत्र यावे,असे आवाहन केले.या मेळाव्याचे संचलन कैलास फुलारी यांनी केले तर शेवटी आभार दीपक बोऱ्हाडे यांनी मानले.यावेळी ओबीसी,भटक्या विमुक्त संघटनेचे पदाधिकारी,जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगर परिषदेचे माजी सदस्य,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे