pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मुद्रांक शुल्क दंड सवलत अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

0 1 7 7 8 0

जालना/प्रतिनिधी,दि.24

राज्याच्या महसुल विभागाच्या वतीने राज्यात मुद्रांक शुल्क दंड सवलत अभय योजना-2023 लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दि.1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत निष्पादीत केलेले संलेख, दस्त याबाबत शासनाने मुद्रांक शुल्क दंड सवलत अभय योजना-2023 लागू केली आहे. तरी नागरिकांनी या मुद्रांक शुल्क दंड सवलत अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हानिबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी आर.बी.मुळे यांनी केले आहे.
अभय योजना ही दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. सदर योजनेचा पहिला टप्पा दि. 1 डिसेंबर 2023 ते दि. 31 जानेवारी 2024 आणि योजनेचा दुसरा टप्पा दि. 1 फेब्रुवारी ते दि. 31 मार्च 2024 या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत दि. 1 जानेवारी 1980 ते दि. 31 डिसेंबर 2000 या कालावधीत निष्पादीत केलेले किंवा नोंदणीस दाखल केलेले किंवा न केलेले संलेख/दस्त, याबाबत महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या विविध तरतुदीनुसार मुदांक शुल्क व दंड वसुलीच्या अनुषंगाने नोंदणी व मुद्रांक विभागाअंतर्गत कार्यवाही सुरु असलेल्या प्रलंबित प्रकरणी मुद्रांक शुल्क व दंडामध्ये पहिल्या टप्प्यात मुद्रांक शुल्कात 25 टक्के सुट व दंडामध्ये 90 टक्के सुट देण्यात आलेली आहे. तसेच सदर योजनेत दुसऱ्या टप्प्यात मुद्रांक शुल्कात 20 टक्के सुट व दंडात 80 टक्के सुट देण्यात येत आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे