pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हास्तरीय “रन फॉर लेप्रसी” मॅरेथॉन स्पर्धेचे 30 जानेवारीला आयोजन

0 1 7 7 7 1

जालना/प्रतिनिधी,दि.24

जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनाखाली कुष्ठरोगविषयक संदेश जनसामांन्यांपर्यत पोहोचवण्यासाठी जिल्हास्तरीय खुली “रन फॉर लेप्रसी” मॅरेथॉनचे स्पर्धेचे जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर पोर्टेबल कोव्हिड केअर युनिट येथे आयोजन दि. 30 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.30 वाजता करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी शारिरीक सक्षम असल्याच्या प्रमाणपत्रासह 29 जानेवारीपर्यंत नाव नोंदणी करुन सहभाग नोंदवावा, असे आवाहन आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहाय्यक संचालक डॉ. सुधाकर शेळके यांनी केले आहे.
मॅरेथॉनचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन करण्यात येणार असून या मॅरेथॉनचा मार्ग जालना जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर पोर्टेबल कोव्हिड केअर युनिट येथुन सुरुवात होवून सामाजिक न्याय भवन, जिल्हा परिषद ते अंबड चौफुली मार्गे सतकर कॉम्पलेक्सपासून जालना जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील पोर्टेबल कोव्हिड केअर युनिट येथे समारोप करण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धकांमधून प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाची निवड करण्यात येईल त्यांना रोख रक्कम (पुरुष गटास) अनुक्रमे 4 हजार रुपये, 2 हजार पाचशे रुपये, 1 हजार 500 रुपये व (स्त्री गटास) अनुक्रमे 4 हजार रुपये, 2 हजार पाचशे रुपये, 1 हजार 500 रुपये व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे