pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते आठ कोटी ५३ लक्ष रुपयांच्या कामांचे उदघाटन

0 1 7 7 6 8

छ. संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.21

जिल्हा परिषदेकडील असलेल्या रस्त्यांचा दर्जा वाढवून ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून घेत तब्बल आठ कोटी ५३ लक्ष रुपयांच्या कामांचे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते करण्यात आले.

नागपूर मुंबई महामार्ग देवळी ते महारुद्र मारुती संस्थान श्रीक्षेत्र गावळीशीवरा – गाजगावकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली होती परंतु सदरील रस्ते हे जिल्हा परिषद कडे येत असल्याने त्या वर थोड्याफार प्रमाणात डागडुजीचे काम होऊन हे रस्ते वारंवार खराब होत होते. यावर आमदार प्रशांत बंब यांनी सदरील रस्त्यांचा पाठपुरावा करून जिल्हा परिषदकडे असणारे रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून घेत जिल्हा नियोजन समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग या खात्यांतर्गत त्यावर तब्बल आठ कोटी 56 लाख रुपयांची मंजुरी घेत घेऊन, एमएचएच -२ सुलतानाबाद गवळीशिवरा गवळी धानोरा ते एमडीआर ३1 (ओडिआर ५४) किमी ०० ते ३/०० तीन ची सुधारणा करणे. एक कोटी रुपये, प्रतिमा -२ पासून सुलतानाबाद – गवळीशिवरा गवळी धानोरा- ३१ ते प्रतिमा -५४ ची सुधारणा करणे चार कोटी १३ लक्ष रुपये, शिरसगाव गाजगाव गवळीशिवरा रस्ता प्रतिमा ३० किमी ४४/८०० ते ४९/०० व ५४/०० ते ६१/५०० ची सुधारणा करणे व दोन वर्षे देखभाल दुरुस्ती करणे यासाठी तीन कोटी चार लक्ष असे एकूण आठ कोटी ५३ लक्ष रुपयांच्या कामांचे उदघाटन आमदार बंब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी बंब यांचे धन्यवाद मानत स्वागत केले.
दरम्यान यावेळी ठेकेदाराने कुठल्याही प्रकारची हलकर्जी न करता ठरवून दिलेल्या मानकाप्रमाणे काम करावे अशा सूचना आमदार बंब यांनी संबंधित ठेकेदारांना दिल्या.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेषरावनाना जाधव संचालक संतोष जाधव, माजी सरपंच प्रदीप भुजबळ, रमेश जाधव, धर्मवीर आध्यत्मिक सेनेचे जिल्हाप्रमुख कडूबाळ गवांदे महाराज, बाजप महिला मोर्चा अध्यक्ष शीला गाढे, मनीष पोळ, विलास सोनवणे, शफिक शेख, ज्ञानेश्वर कराळे, रमेश तायडे, दादासाहेब तायडे, सुनील वंजारेझ कैलास तायडे, मिलिंद वंजारे, जावेद शेख, वसंत जाधव, संतोष तायडे, साईनाथ तायडे, एकनाथ तायडे, चंद्रकांत गवळी,समीर शेख, तारेख भाई यांच्यासह नागरिक तसेच महिलांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 6 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे