pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची शुक्रवारी डॉ.कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ सभा

0 1 7 7 4 8
जालना/प्रतिनिधी,दि.7
जालना लोकसभा मतदार संघातील महाविकास (इंडिया) आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची दि. 10 मे शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता जालना शहरातील डॉ. फ्रेजर बॉईज हायस्कुलच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहीती आ.कैलास गोरंट्याल यांनी आज बुधवारी येथे एका पत्रकार परिषदेत दिली.
येथील हॉटेल अंबरमध्ये आज सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, माजी आ.शिवाजीराव चौथे, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, काँग्रेसचे जालना शहर जिल्हाध्यक्ष शेख महेमुद, राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, सपाचे जिल्हाध्यक्ष शेख नबी शिपोरकर, आपचे जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे, शिवसेनेचे शहरप्रमुख बाला परदेशी, कॉग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष राम सावंत, मनिष श्रीवास्तव, बाबुराव पवार, राजेंद्र जाधव आदिंची उपस्थिती होती. यावेळी अधिक माहिती देतांना आ.कैलास गोरंट्याल म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते शरदचंद्र पवार यांच्यासोबत जे कट कारस्थान भाजपाने रचले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांबद्दल सर्व सामान्य जनतेमध्ये मोठी सहानुभुती निर्माण झाली असून त्यांच्या सभा आयोजित करण्याची मागणी सर्व सामान्य जनतेतून केली जात आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची एखादी तरी सभा जालना शहरात व्हावी यासाठी पक्षश्रेष्ठीकडे महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी केली होती. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जालना येथे सभा घेण्याची तयारी दर्शवीली असून येत्या 10 मे शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता जालना शहरात त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याचे आ.कैलास गोरंट्याल यांनी सांगीतले. या जाहीर सभेस जालना शहर व जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाविकास आघाडीतील नेते माजी मंत्री आ.राजेश टोपे, आ.कैलास गोरंट्याल, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, माजी आ.शिवाजीराव चौथे, माजी आ. संतोष सांबरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, काँग्रेसचे जालना शहर जिल्हाध्यक्ष शेख महेमुद, माजी नगराध्यक्ष बबलु चौधरी, राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, सपाचे जिल्हाध्यक्ष शेख नबी शिपोरकर, आपचे जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे, शिवसेनेचे शहरप्रमुख बाला परदेशी आदिंनी केले आहे.
——————————————————–
आ.गोरंट्याल यांच्या निवासस्थानी आज बैठक
जालना लोकसभा मतदार संघातील महाविकास (इंडिया) आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या जालना शहरात आयोजित करण्यात आलेल्या सभेच्या पार्श्वभुमीवर उद्या दि.8 मे बुधवार रोजी सकाळी 11 वाजता आ.कैलास गोरंट्याल यांच्या प्रीतीसुधा नगरमधील निवासस्थानी जालना विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
——————————————————–
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 4 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे