pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महासंस्कृती महोत्सवात सहभागासाठी लोककलावंतांना आवाहन 5 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावेत

0 1 7 7 6 8

जालना/प्रतिनिधी,दि.31

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत जालना जिल्ह्यात दि. 13 ते 17 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ‘महासंस्कृती महोत्सवाचे’ आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवात कलेच्या सादरीकरणासाठी जिल्हयातील स्थानिक लोककलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाणार आहे.  महासंस्कृती महोत्सवातंर्गत जिल्हा व तालुकास्तरावर लोककलावंत कार्यक्रम सादर करु शकतील. ज्या इच्छुक लोककलावंतांना जिल्हास्तरीय कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी  निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात तर ज्या लोककलावंतांना तालुकास्तरीय कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांच्याकडे अर्ज व त्यासोबत कार्यक्रमाचे स्वरुप, कार्यक्रम सादर केल्याचे अनुभवाचे पुरावे, छायाचित्र आदी परिपूर्ण माहितीचा प्रस्ताव दि. 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करावा, असे आवाहन महासंस्कृती महोत्सवाच्या जिल्हा समन्वय व सनियंत्रण समितीने केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 6 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे