चिचलवाडी ता.मुखेड येथे आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्था शाखा नामफलकाचे हभप राम महाराज यांच्या हस्ते अनावरण
नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.27
चिचलवाडी ता.मुखेड येथे आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्था शाखा नामफलकाचे अनावरण दि.२८ एप्रिल २०२४ रोज रविवारी रोजी सायंकाळी ४ वाजता मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात, नामघोषात बोर्डाचे ऊदघाटन संस्थापक अध्यक्ष हभप गुरूवर्य राम महाराज पांगरेकर ,अनेक प्रमुख मान्यवर संस्थेचे मार्गदर्शक रावसाहेब पाटील शिराळे, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव माळकौठेकर, जिल्हाप्रसिध्दि प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल प्रभाकर पा.पुय्यड,श्री भगवान पा. रहाटीकर, बालाजी पवार,इत्यादी मान्यवरांच्या गावकऱ्यांच्या, परिसरातील भाविक भक्ताच्या ऊपस्थित नामफलकाचे अनावरन, होनार आहे.
मुखेड तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकत्यांनी बोर्डाचे अनावरण प्रसंगी उपस्थित राहावे शाखा अनावरण करणे म्हणजे धर्माचे रक्षण,संतांचे वाड्यमय घरोघरी गेले पाहिजे धार्मिक भावना वाढली पाहिजे सुसंस्कृत पिढी निर्माण व्हावी म्हणुन घर तिथे ज्ञानेश्वरी जावी म्हणुन गत सहावर्षापासुन घरोघरी मोफत ग्रंथ देऊन ज्ञानेश्वरी पारायण आपल्या सर्वांच्या सहकार्याने यावर्षी जेवढ्या ज्ञानेश्वरीत ओव्या आहेत तेवढे ग्रंथ पारायण करण्याचा संकल्प,आपल्या हक्काची पंढरपुर येथे धर्मशाळा स्थापन करण्यासाठी विचार विनिमय स़ताचे वा:गमयाचा प्रचार प्रसार व्हावा यांची माहिती घेण्यासाठी मेळाव्यात उपस्थित राहाण्याचे आव्हान ता.अध्यक्ष
मारोतराव पा.वडजे, बालाजी जामकर, श्रीपतराव महाराज, दुर्योधन बोडके, अनिल राव शिंदे, नागनाथ देवकते,यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वि करण्यासाठि आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे सर्कल प्रमुख सुंडके संजय,चिंचलवाडी शाखा अध्यक्ष मल्हारी बामणे, मालोजी पांढरे, रघुनाथ नरोटे, ईत्यादिने केले आहे.मोठ्या प्रमाणात भाविक भक्त पदाधिकारी सहभागी व्हावे असे पत्रक जिल्हाप्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिले आहे.