pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

बिल्डर दत्ता धोंडिबा बंडगर यांच्याकडुन जमीन व्यवहारात शेतक-यांची एक अब्ज चौपन्न कोटी चाळीस लाख रूपयांची फसवणूक

- विकसित बांधकाम परस्पर दुस-यांना विकण्याचा बिल्डरचा प्रताप. - विकसित बांधकामा बाबत शेतक-यांची फसवणूक. - फसवणूक झालेले तक्रारदार सदनिकाचा घेणार ताबा. - फिफ्टी फिफ्टी (50/50 )च्या व्यवहारात बिल्डरकडून जमीन मालकांची दिशाभूल.

0 1 7 7 5 8

उरण/ विठ्ठल ममताबादे,दि.13

बिल्डर दत्ता धोंडिबा बंडगर, वय 45 वर्षे,कर्मचारी इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग घणसोली, नवी मुंबई सेंच्युरी डेव्हलपर्सचे मालक यांनी खुटुक बांधण पोस्ट -खारघर, ता. पनवेल, जिल्हा रायगड येथील शेतक-यांच्या जमिनी फिफ्टी फिफ्टी तत्वाने विकसित करताना सर्व्हे नंबर 60 मौजे खूटुक बांधण क्षेत्र 14 गुंठे ( अंदाजे किंमत प्रतिगुंठा साडेपाच कोटी प्रमाणे) 77 कोटी रुपयांची फसवणूक केली आाहे. शासनाकडे सातत्याने याबाबत पत्र व्यवहार, पाठपुरावा करूनही जमीन मालकांना न्याय मिळत नाही म्हणून शेवटी सर्व जमीन मालकांनी एकत्र येत शांततेच्या मार्गाने सत्याग्रहाचा अंगिकार करून, विकसित सदनिका पैकी जमीन मालकांच्या राहत्या जागेचा 50% सदनिकांचा ताबा जमीन मालक घेणार असून जमीन मालकांनी याबाबत सिडको प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे.

बिल्डर बंडगर यांनी शेतक-यांची अंदाजे 77 कोटी रूपयांच्या बाजार मुल्यांच्या जमिनीची फसवणूक केली आहे. तर विकसित सदनिकांची किंमत प्रति चौ. फूट 15 हजार रूपये या प्रमाणे 51,600 चौ. फूटांचे 77 कोटी चाळीस लाख असे एकुण एक अब्ज चौपन्न कोटी चाळीस लाख रूपयांची फसवणूक बिल्डर बंडगर यांनी शेतकऱ्यांची (जमीन मालकांची )केली आहे त्यामुळे त्यांची ईडी चौकशी व्हावी अशी जमीन मालकांनी उचलून धरली आहे.

सदर जागा हि जमीन मालकांची आणि राहती घरे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची आहेत. सदरचे गाव हे खुटूक बांधण, पो. खारघर, ता. पनवेल, जि. रायगड हे जुने मुळ गावठाण आहे.या गावठाणातील घरांना पॉपर्टी कार्ड मिळावे, स्वयंविकासाचा अधिकार मिळावा यासाठी मा. जिल्हाधिकारी रायगड आणि भूमिअभिलेख रायगड यांना प्रस्ताव सादर करून गावठाण हक्कांसाठी सर्व शेतकरी, जमीन मालक हे मा. उच्च न्यायालयात जाऊन न्याय मागणार आहेत.बिल्डर बंडगर यांनी केलेल्या 50 / 50 (फिफ्टी/ फिफ्टी )च्या व्यवहारात 50% सदनिका या शेतकऱ्यांच्या /जमीन मालकांच्या आहेत. शेतकऱ्यांच्या (जमीन मालकांच्या )वाटयाचे विकसित बांधकाम शेतकऱ्यांना, जमीन मालकांना न देता परस्पर विकण्याच्या तयारित असणा-या बंडगर यांच्या विरोधात अनेक तक्रारी करूनही पोलीस स्टेशन, शासन यांच्याकडून शेतकऱ्यांना, जमीन मालकांना आजपर्यंत न्याय मिळालेला नाही.एकुण सदनिकांपैकी ज्या सदनिका बिल्डरने इतरांना विकल्या आहेत त्यांच्या घराखालील जागेचे मालकही हे शेतकरी आहेत.वसंत काळू घरत, दत्ता काळू घरत, मनोहर आबा पाटील यांच्यासह एकूण 25 व्यक्ती हे बाधित आहेत. या सर्वांवर अन्याय झाला आहे.मूळ घरपट्टीधारक, प्रॉपर्टी धारक हे शेतकरी असूनही राहायला आलेल्या कोणत्याही नागरिकांना शेतकऱ्यांनी कधीच त्रास दिलेला नाही. येथील गणेश मंदिर खारघरचे भक्त आणि विश्वस्त घरत परिवाराचे लोक पूर्ण नवी मुंबईत सुप्रसिध्द आहेत.शेतकऱ्यांची( जमीन मालकांची) फसवणुक होऊनही निराश होऊन आत्महत्या करणे हे पाप आहे असे समजून आता पर्यंत भारतीय संविधान आणि लोकशाहीवर अढळ विश्वास ठेऊन शेतकरी जगत आहेत.रायगड जिल्हा हा भारतीय नौदलाचे संस्थापक छत्रपती शिवराय आणि कसेल त्याची जमिन राहील त्याचे घर या कुळ कायद्याचे शिल्पकार आगरी समाजभूषण नारायण नागू पाटील आणि भारताचे संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून उर्वरित सदनिकांचा ताबा सदर शेतकरी घेणार आहेत. या घरहक्काच्या सत्याग्रहात पोलीसांनी सुरक्षा द्यावी महसूल, सिडको यांनी मान्यता द्यावी असे आदेश देण्यात यावेत अशी मागणीही येथील शेतकऱ्यांनी पत्रव्यवहाराद्वारे सिडको व पोलीस प्रशासनाकडे केली आहे.सदर पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य विरोधी पक्षनेते,महसूल मंत्री,राजपाल महाराष्ट्र राज्य, विधानसभा अध्यक्ष, मावळ मतदार संघ खासदार,इडी कार्यालय, जिल्हाधिकारी रायगड, तहसीलदार पनवेल, इंदिरा गांधी इंजिनिअरिंग कॉलेज घणसोली, कोकण आयुक्त, पनवेल महानगर पालिका आयुक्त, प्रांताधिकारी पनवेल, सचिव महसूल व वन विभाग, आमदार पनवेल, लोकायुक्त कार्यालय, सिडको कार्यालय, मानवी हक्क आयोग, पोलीस आयुक्त आदी ठिकाणी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे