pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

    जालना येथे ज्येष्ठ नागरिकांचे शिबीर व मेळाव्याचे 21 एप्रिलला आयोजन

0 1 7 7 4 2

 जालना/प्रतिनिधी, दि. 18

“सामाजिक न्याय समता पर्व” अभियानाअंतर्गत समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांच्या अनुषंगाने थेट जनतेपर्यंत संवाद साधण्यासाठी शुक्रवार, दि.21 एप्रिल 2023 रोजी ज्येष्ठ नागरिकांचे शिबीर व ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे आयोजन जालना नगर परिषदेच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी शिबीरास व मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी केले आहे. ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात व शिबिरात तज्ञ डॉक्टरांचे पथक आरोग्य तपासणी करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड  तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी संतोष खांडेकर व एल्डर लाईन राष्ट्रीय हेल्पलाईनचे स्वप्नील बारहाते उपस्थित राहणार आहेत. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे