pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उरण शहरात आयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठापणे निमित्त भव्य शोभयात्रा

0 1 7 7 3 1

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.22

अयोध्येतील राम मंदीर प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमाच्या निमित्ताने उरण शहरातील राम मंदीर चौकातून काल सोमवारी उरण मधील नागरिकांनी निनादात शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीची सुरुवात गणपती चौक ते स्वामी विवेकानंद चौक,कामठा मार्ग,पालवी रुग्णालय,बालई मार्गे जारीमरी मंदीर,बाजारपेठ मार्गे पुन्हा गणपती चौका पर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीत,महिला, लहान मूल,जेष्ठ नागरिक यांच्यासह तरूण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या राम घोषात निघालेल्या शोभायात्रेचे उरणच्या नागरिकांनी ठीक ठिकाणी रांगोळी, पुष्प वर्षाव करीत स्वागत करण्यात आले. तर महिला आणि तरुणांनी राम धुनिवर नृत्य करीत आपला आनंद व्यक्त केला.तर उरण तालुक्यातील चिरनेर,चिर्ले,आवरे,फुंडेसह संपूर्ण तालुक्यातील प्रभू रामाची मंदिरे साजविण्यात येऊन प्रभू रामाचा जयघोष दुमदुमत होता.

या शोभायात्रेत उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शहरातील व्यापारी,स्वयंसेवी संस्थाचे पदाधिकारी,महिला प्रभुरामांच्या वेशभूषा करून शालेय विद्यार्थी ढोलताशाच्या गजरात आनंदाने नाचत प्रभू रामांचा जयघोष करीत शेकडो नागरिक सहभागी झाले होते. या शोभायात्रेमुळे उरण शहरात प्रवेश करण्यासाठी असलेले काही मार्ग बंद करण्यात आले होते. त्याचप्रमाणे संपूर्ण बाजारपेठ ही बंद होती. या शोभायात्रेमुळे शहरात मोठ्या प्रमाणात उत्साह दिसत होता. उरण शहरात सर्वत्र राम नामाचा जयघोष दुमदुमला होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे