जिल्हयातील नोंदणीकृत अंशकालीन उमेदवारांना सेवायोजन नोंदणीची माहिती अद्यावत करण्याचे आवाहन.

जालना/भगवान धनगे:दि.1
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर जालना जिल्ह्यातील 559 पदवीधर अंशकालीन उमेदवार नोंदणीकृत आहेत. या नोंदणीकृत उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक व इतर माहिती अद्यावत करावी अशा सुचना मा. डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, जालना यांनी दिलेल्या आहेत. यासाठी विशेष माहिती अदयावतीकरण मोहीम दि. 4 एप्रिल ते 11 एप्रिल 2022 दरम्यान राबविण्यात येत आहे.
याप्रमाणे जालना जिल्ह्यातील सर्व 559 पदवीधर अंशकालीन उमेदवारांना टपालाने पत्रे पाठविण्यात आलेले आहे. याप्रमाणे शपथपत्रात उमेदवारांनी सत्य माहिती स्वत: भरुन सद्यस्थितीतील सर्व शैक्षणिक अर्हता, व्यवसायिक अर्हता, अनुभव प्रमाणपत्र, आधारकार्ड व इतर आवश्यक कागदपत्रांसह खालील नमूद तालुकानिहाय
वेळापत्रकाप्रमाणे कार्यालयातील उपलब्ध सक्षम अधिकारी यांचे समक्ष स्वखर्चाने प्रत्यक्षात येवून समक्ष स्वाक्षरी करून सादर करावे. उमेदवारास प्रत्यक्षात येणे शक्य नसल्यास मा. तहसीलदार तथा सक्षम अधिकारी तहसील कार्यालय यांचे समक्ष स्वाक्षरी करुन साक्षंकित केलेले शपथपत्र या कार्यालयास शिघ्र डाकने निर्देशित दिनांकापर्यंत पोहचेल असे सादर करावे असे सूचित करण्यात आले आहे.
सदर माहिती अद्यावत करणे करीता तालुका निहाय दि.4 एप्रिल 2022 रोजी अंबड व घनसांवगी तालुका, दि.5 एप्रिल 2022 रोजी परतुर व मंठा तालुका, दि.7 एप्रिल 2022 रोजी भोकरदन तालुका, दि.8 एप्रिल 2022 रोजी जालना तालुका, दि.11 एप्रिल 2022 रोजी बदनापुर व जाफ्राबाद तालुक्यातील उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे. ज्या उमेदवारास पत्राद्वारे शपथपत्र प्राप्त झाले नाही अशा उमेदवारांना शपथपत्र देण्याची व्यवस्था कार्यालयामार्फत संदर्भित दिनांकास करण्यात आलेली आहे.
या मोहीमेचा हेतु फक्त उमेदवारांची माहिती अद्यावतीकरण करणे व सद्यस्थितीची माहिती संकलन करणे एवढाच आहे. यासाठी कोणतेही प्रवास शुल्क व खर्च देय नाही. तसेच, वरीलप्रमाणे सूचित केल्यानुसार ज्या उमेदवारांचा प्रतिसाद मिळणार नाही त्यांना रोजगार सहाय्यामध्ये स्वारस्य नसल्याची नोंद उमेदवारनिहाय घेण्यात येईल याची नोंद घ्यावी. या पुर्वी नोंदणीकृत पदवीधर अंशकालीन उमेदवारांनी आपल्या तालुक्यास देण्यात आलेल्या तारखेस जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, जालना या ठिकाणी सकाळी 10.30 ते सांयकाळी 5.00 या वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.