बजाजनगर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

औरंगाबाद/आनिल वाढोणकर,दि.14
औरंगाबाद येथील बजाज नगर स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पहाटे ५.०० वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या महाभिषेक सेवेने उत्सवाला सुरवात झाली. सकाळी ८.०० च्या भुपाळी आरतीनंतर सर्व सेवेकऱ्यांना गुरूपद देण्याच्या सेवेला सुरवात झाली. वरूणराज्याच्या अखंड उपस्थितीत सकाळपासून केंद्र परिसरात पंचक्रोशीतील सर्व सेवेकरी भावीकांची रागा लागल्या होत्या. दिवसभर सदर सेवा अखंडपणे सुरू होती. एकुण ८००० भाविक सेवेकऱ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरूपद घेण्याची विनंती केली.
श्री गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने केंद्रात रक्तदान शिबीर व मोफत दंत चिकित्सा शिबीराचे अयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने भाविक सेवेकऱ्यांनी या शिबीराचा लाभ घेतला व मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.