pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शेलघर येथे जल कुंभाचे महेंद्र घरत यांच्या शुभहस्ते भूमिपूजन

0 1 7 4 7 1

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.24

सन १९९७ ते २००२ कालावधी मधे जिल्हापरिषद सदस्य म्हणून कामगार नेते महेंद्र घरत यांनी केंद्र सरकारच्या पायलट योजने मार्फत पनवेल, उरण मधे ५७ पाण्याचे जलकुंभ उभारून खेडोपाड्यातील घराघरात नळाद्वारे पाणीपुरवठा सुरु करून महिला भगिनींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरविण्याचे काम महेंद्र घरत यांनी केले होते.
पंचवीस वर्षानंतर शहरीकरण वाढले,गावांची लोकसंख्या वाढली तसेच सिडकोच्या नियोजनामुळे पाण्याचे स्रोत बदलले, जुने जलकुंभ जिर्ण झाले. नवीन शहरांच्या कुशीत असलेल्या गावांना शहरांप्रमाणे चोवीस तास पाणी व विजपुरवठा ही संकल्पना घेऊन शेलघर, कोपर, गव्हाण, शिवाजीनगर, बामनडोंगरी, मोरावे, वहाळ, जावळे या गावांचा उलवेनोड मधून विजपुरवठा सुरु केला. पूर्वी पनवेल -जासई मार्गे विजेचा पुरवठा असल्याने सतत नादुरुस्त वाहिन्यांमुळे दोन -तीन दिवस प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांना अंधारात रहावे लागत असे. डीपी गेल्यास आठ ते दहा दिवस अंधारात काढावे लागत असत. ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीच्या जिवावर सिडकोने एकविसाव्या शतकातील शहर म्हणून आपली जाहिरात केली त्या गावांतील अखंड वीज व पाणीपुरवठा तसेच नागरी सुविधा पुरविण्यासाठी कामगार नेते महेंद्र घरत यांनी पाठपुरावा केला. सिडको बरोबर पाठपुरावा करून गावोगावी मैदाने, रस्ते, गटारे, अखंड विजपुरवठा, नव्याने जलकुंभ उभारणी करण्याची सुरुवात केली.तिन साडेतीन वर्षाच्या पाठपुराव्याअंती शेलघर गावासाठी अडीचकोटी रुपयांचा निधी मंजूर करून नवीन जलकुंभाची उभारणीसाठी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी सिडको तर्फे एस.ई.-श्री. गोसावी ,कार्यकारी अभियंता श्री. पितळे , जि. प. सदस्य रवींद्र पाटील, सरपंच माई भोईर, उपसरपंच सचिन घरत, ग्रा. पं. सदस्य हेमंत पाटील, रोशन म्हात्रे, अरुण कोळी, चंद्रकांत घरत, अनिल घरत, योगिता भगत, गणपतशेठ घरत, रमेश घरत, प्रकाश भोईर, सुहास भगत, प्रदीप घरत, विशाल कोळी, के. डी. कोळी आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे