pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

धनगर समाजाच्या मोर्चाला माळी समाजाचा पाठिंबा : मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : संजय राऊत

0 1 7 4 4 4

टेभुर्णी/ सुनिल भाले,दि.21

टेंभुर्णी : धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयात धडकणाऱ्या मोर्चात अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे यामुळे या मोर्चात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष संजय राऊत तथा टेंभुर्णी शहराध्यक्ष शंकर मुळे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
धनगर समाजाची गेल्या अनेक वर्षापासूनची एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी असून शब्द भ्रमामुळे भटके असलेल्या धनगर या समाजाचा एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आला नाही.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाची उभारणी व्हावी, जातनिहाय जनगणना व्हावी, मेंढपाळांना शस्त्र परवाना द्यावा, मेंढ्यांना चरण्यासाठी वनक्षेत्र आरक्षित करावे, शेळी मेंढी विकास महामंडळात दहा हजार कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा यासह विविध मागण्यांसाठी जालना येथे निघणाऱ्या मोर्चाला अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अविनाश ठाकरे, संतोष जमधडे यासह जाफराबाद तालुक्यातील माळी बांधवांनी जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले आहे. यावर
माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष संजय राऊत ,शहराध्यक्ष शंकरराव मुळे, रावसाहेब अंभोरे, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रवींद्र उखर्डे ,शहराध्यक्ष पुंजाराम धनवई, माजी सरपंच गणेशराव धनवई, ज्ञानेश्वर उखर्डे, बालू धनवई ,ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग बोरसे , शिवाजी मुळे,माजी सरपंच विष्णू जमधडे , युवा नेते दीपक जमधडे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद उखर्डे अशोक जाधव ,संदीप मुळे, विठ्ठल मुळे, बाळू मुळे गणेशराव सातभाई , गणेश कुदळे शेषराव खांडेभराड गणेश तांबेकर विनायक ढवळे बंडू सातभाई अशोक पाबळे शुभम मुळे,रवी खरात, सुरेश राऊत,ज् ,सावता गोरे, विलास गोरे, अशोक गोरे ,अनिल जाधव, विठ्ठल मुळे ,सतीश खांडेभराड,स्वप्निल वाघमारे ,रंगनाथ जमदाडे गोपाल कुदळे, सका ढवळे, संतोष खांडेभराड ,ज्ञानेश्वर ढवळे, तानाजी जमधडे ,रामराव मुळे ,विशाल झोरे,शिवाजीराव खांडेभराड, विठ्ठल सातभाई, अमोल तांबेकर यांच्यासह आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे