pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

माझी कर्मभूमी घनसावंगी, इथल्या जनतेसाठी लढणार :  सतीश घाटगे

पारडगावातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश  

0 1 7 4 2 4
अंबड/प्रतिनिधी, दि.7
घनसावंगी मतदारसंघातील विकासाची सर्व केंद्र प्रस्थापितांच्या ताब्यात असताना देखील २५ वर्षात घनसावंगी मतदारसंघातील गावे, वाड्या, वस्त्या विकासापासून दूर आहेत. २५ वर्षात अनेक गावांचे मुख्य रस्ते देखील होऊ शकले नाहीत. ही खेदाची बाब आहे. माझी जन्मभूमी घनसावंगी नसली तरी कर्मभूमी हीच आहे. जन्मभूमीपेक्षा कर्मभूमी नेहमी श्रेष्ठ असते. माझ्या कर्मभूमीतल्या गरीब शेतकरी व कष्टकरी जनेतेला प्रस्थापितांच्या दडपशाहीतून मुक्त करण्यासाठी मी राजकारणाच्या मैदानात उतरलो आहे. असे भाजपा नेते तथा घनसावंगी विधानसभेचे प्रमुख सतीश घाटगे यांनी स्पष्ट केले.
घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील शेकडो  शेतकरी व युवकांनी शुक्रवारी (दि.७)  अंबड येथील जनसेवा कार्यालयात सतीश घाटगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजप पक्षात प्रवेश घेतला. यावेळी उपस्थितांसमोर सतीश घाटगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पारडगाव येथील गजानन ढेरे व डॉ. कैलास ढेरे  यांच्या नेतृत्वाखाली पारडगावातील शेतकरी व युवक भाजपमध्ये दाखल झाले. यामध्ये विलास आढाव, गजानन सुरसे, आसाराम व्यास, भास्कर ढेरे, विष्णू डोळझाके, माणिक सुतार, अमोल नाटकर, सुनील नाटकर, अविनाश सुतार, हरून पठाण, अर्जुन बढे, दीपक कुमावत, भारत स्वामी, शिवदास साबळे, राहुल वाढेकर, दत्ता गायकवाड, कृष्ण गोरे, दत्ता तायडे आदींचा समावेश आहे.
शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्याविरोधात नेहमी मी भूमिका घेतली आहे. परंतु, सिस्टीमच्या बाहेर राहून जी कामे करता येतात, त्यापेक्षा अधिक कामे राजकारणाच्या माध्यमातून करता येतात. म्हणून जनतेची अपेक्षा आणि मागणीच्या आग्रहाखातर राजकारणात आलो आहे. घनसावंगी मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत २५० किमीचे शेतरस्ते स्वखर्चातून तयार केले आहे. यापुढे  मागेल त्या गावात पानंद रस्ते तयार करणार आहे. ग्रामीण भागातून युवकांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी शेतकऱ्यांची शेती समृद्ध करणे हे माझे ध्येय आहे. यासाठी वीज, पाणी आणि रस्त्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे सतीश घाटगे यांनी सांगितले. यावेळी यावल पिंपरीचे सरपंच राजकुमार उगले, गणेश पघळ, विकी पाटील, कैलास ढेरे, परमेश्वर ढेरे, भास्कर ढेरे, अंबादास ढेरे आदी उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे