ज्ञानगंगा इंग्लिश स्कूलचे ७ वे वार्षिक स्नेसंमेलन उत्साहात संपन्न.
शहगड/तनवीर बागवान,दि.5
वडीगोद्री येथील ज्ञानगंगा इंग्लिश स्कूलचे ७ वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक माजी जिप सदस्य सदाशिव दुफाके तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ईसा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भरत भांदरगे हे होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद माजी अध्यक्ष ज्ञानदेव बांगर,अंतरवालीचे सरपंच पांडूरंग तारख,माजी सरपंच अशोक चिमणे,अभिजीत कावले,अर्जुन भुतेकर,शाळेचे अध्यक्ष सोमनाथ काळे,जेष्ठ पत्रकार दिलीप पवार,समर्थ चे संचालक अशोक मांगदारे,गुरुदेव सेवाश्रमचे सेवाधिकरी बप्पासाहेब काळे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे,रामप्रसाद तारख,ॲड.वसंत गायकवाड,अण्णासाहेब पवार आदींची उपस्थिती होती.
शाळेच्या बाल कलाकारांनी विविध मराठी व हिंदी गीतावर दिलखेचक नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.ए मेरे वतन के लोगो,झाशी की राणी लक्ष्मीबाई,अग राधे तू हळूहळू चालना,टुकुर टुकूर,मल्हारी मल्हारी आदी गाण्यावरील नृत्यानी प्रेक्षकांची वाहवाह मिळवली.
विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणातुन विविध हिंदी मराठी गाण्यांवर नृत्य सादर केले.समाज प्रबोधनपर नाटीका सादर केली.यावेळी गावातील विजय खटके,पत्रकार रविंद्र घाडगे,रोहिदास पवार,अनंत मुंडे,ॲड.राजेंद्र पवार,किर्तीनंद गांगुर्डे,दिपक ठाकूर,उपसरपंच अण्णासाहेब काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी गावातील व परीसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना देशमुख व रुपाली आटोळे यानी केले तर प्रास्ताविक संस्थाध्यक्ष सोमनाथ काळे यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीते साठी मुख्याध्यापिका टी.एन.पठाण,आर.डी.आटोळे,व्ही.बी.गावडे,एन.व्ही.लाहूरे.देशमुख,मराठे,कोटंबे,काळे,वरकड,दखने,पाश्टे, आणि शाळेचे संस्थापक सोमनाथ काळे,संस्थेचे उपाध्यक्ष सुनिल काळे,शिक्षक हरि गावडे,बळीराम कनके,श्रीराम तोडकर शुभम ठाकूर,कैलास बिबे,विलास जाधव आदींनी परिश्रम घेतले.