pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

क्रेडाई एक्स्पो २०२३ ला महेंद्रशेठ घरत यांची भेट !

0 1 7 3 9 3

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.2

वाशी येथे बिल्डर्स असोशिएशन ऑफ नवी मुंबई यांच्या तर्फे आंतरराष्ट्रीय दर्जा सारखे क्रेडाई एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. या एक्स्पोला रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी भेट दिली. नवी मुंबई मध्ये सध्या सिडकोच्या माध्यमातून अनेक प्रकल्प आले आहेत त्यामुळे नवी मुंबई मधील घरे येत्या काळात मुंबईच्या भावाने विकली जातील. आत्ताच मेट्रोचे उद्घाटन झाले आहे, येत्या काळात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु होतोय, न्हावा शिवडी सागरी सेतू सुरु होतोय त्यामुळे नवी मुंबईला कनेक्टीव्हीटी वाढत आहे. बिल्डर उद्योगामध्ये नवीन पिढी उतरली आहे त्यामुळे बाहेर देशातील सुविधांप्रमाणे नवी मुंबईत सुविधा देण्याच्या नवीन पिढीचा प्रयत्न आहे. अतिशय अत्याधुनिक स्टॉल्स या एक्झिबिशन मध्ये आहेत याचा फायदा नवी मुंबई करांना नक्कीच होईल. उच्चशिक्षित तरुण बिल्डरांमुळे नवी मुंबईच्या सौंदर्यात चार चांद लागले आहेत व नवी मुंबईच्या प्रगतीमध्ये बिल्डरांचा मोलाचा वाटा आहे असे महेंद्रशेठ घरत यावेळी म्हणाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 9 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे