महाराष्ट्र

महामार्ग पोलिसांची धडाकेबाज कारवाई,वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकाकडून एका दिवसात 1लाख 37 हजाराचा दंड वसूल.

जालना/प्रतिनिधी:दि.25

औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्ग पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. रविवार दिनांक 22 रोजी सहा.पो.निरि. सुरेश भाले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने महामार्गावर वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. सदरील कारवाईमध्ये वाहतुकीचे नियम पालन न करणाऱ्या 339 वाहन चालकांकडून एका दिवसात 1 लाख 37 हजार 600 रू. चा दंड वसूल करून धडाकेबाज कारवाई केली. सदरील कारवाई औरंगाबाद- जळगाव महामार्गावर मंगरूळ फाट्याजवळ सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये केली. बऱ्याच वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई झाल्याने बेशिस्त आणि नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनाधाकांमध्ये खळबळ माजली. यामध्ये विना हेल्मेट वाहन चालवणे 156, विनासिटबेल्ट-24, लेनकटिंग-24, अतिवेग-12, चालू वाहन मोबाईलवर संभाषण करणे-5 व इतर आशा एकूण 339 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली.

मागील आठवड्यात याच माहामार्गावर मंगरूळ फाट्याजवळ मोठा आपघात होऊन दोन तरूणांचा मृत्यू झाला होता.या घटने नंतर महामार्ग पोलीस विभागाच्या पोलीस निरिक्षक श्रीमती नंदिनी चानपूरकर यांनी वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने सहा.पो.निरि. सुरेश भाले यांनी तातडीने धडाकेबाज कारवाई केली. सदरील कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव, मा. पोलीस उप अधीक्षक श्री प्रीतम यावलकर, मा.पोलीस निरीक्षक श्रीमती नंदिनी चांनपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक सुरेश भाले, सहा.पोलीस उप निरीक्षक हरीचंद पवार, विश्वास पडुळ, पोलीस हवालदार अझर खान, नंदकुमार नारोटे, श्रीकांत चेळेकर, राजू लघाणे, विनोद जारवाल, समाधान दुबेले इत्यादींच्या वतीने करण्यात आली.

BHAGWAN DHANAGE

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close