pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मोठीजुई शाळेत “बंदरावरची शाळा ” या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन

0 1 7 3 9 1

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.31

उरण तालुक्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारी एकमेव शाळा म्हणजे मोठीजुई शाळा आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानरचनावादाला सतत प्रोत्साहन देते आणि याच ज्ञानरचनावादाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा मोठीजुई येथे रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा निमित्ताने बंदरावरची शाळा या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. नारळीपौर्णिमा म्हणजे श्रावणी पौर्णिमा.हा दिवस म्हणजे समुद्रा विषयी कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्याचा दिवस.बंदरावरची शाळा या उपक्रमातंर्गत इयत्ता ३ री ते ७ वी च्या पाठ्यपुस्तकातील अनेक घटकांची प्रत्यक्ष समुद्रावर जाऊन उपलब्ध साहित्याच्या आधारे विद्यार्थ्यांनी स्वतः माहिती घेतली. यामध्ये देशातील बंदराची माहिती,भरती – ओहोटी, उधानाची भरती,भांगाची भरती, सागर संपत्ती,महासागर तळरचना,लाटनिर्मिती, त्सुनामी निर्मिती,सागर प्रदूषण समस्या व उपाय, विविध प्रकारच्या मासे व मासे पकडण्याच्या साहित्यांची माहिती माहिती मुलांना देण्यात आली. या उपक्रमामुळे मुलांना छोट्या मोठ्या संकल्पना सहज समजले . विद्यार्थी स्वतः सहभागी असल्याने समुद्राविषयीची भिती दूर होऊन त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला ,त्याचबरोबर पारंपारिक सण व समुद्राला आळवणी करण्यासाठी पारंपारिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांकडून समुद्राची पुजा करून नारळ वाहण्यात आला.नृत्य,गायनातून विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक संजय होळकर, उपक्रमशील शिक्षक कौशिक ठाकूर,विषय शिक्षक दर्शन पाटील, सुरेखा खराटे,यतीन म्हात्रे,अंकुश पाटील आदींनी विशेष मेहनत घेतली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 9 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे