pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाची पुर्व तयारी आढावा बैठक संपन्न

0 1 7 3 9 3

जालना/प्रतिनिधी,दि.6 

युवकांचा सर्वांगीन विकास करणे, संस्कृती व पंरपरा जतन करो, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे, राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणेसाठी प्रतिवर्षी जिल्हा, विभाग व राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. त्याअनुषंगाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि.9 व 10 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय युवा महोत्सवाची पुर्व तयारी आढावा बैठक दि.6 डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, कृषी उपसंचालक डॉ. संदिप जगताप, लघुटंकलेखक एस.डी.लोखंडे, क्रीडा कार्यालयाचे सतिश वाबळे यांची उपस्थिती होती. जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत दि.9 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता जालना येथील नुतन महाविद्यालयात करण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या युवक-युवतींना छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या विभागस्तरीय युवा महोत्सवात प्रवेश मिळणार असून जिल्ह्यातील युवक-युवतींनीसह कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा. जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा व युवा सेवा संचालनालय आणि कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 9 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे