विविध व्यासपीठावर आपल्या समालोचन आणि निवेदनातून जनजागृती आणि समाजप्रबोधन करणाऱ्या शिवसंकल्प समालोचक असोसिएशन तर्फे कळंबुसरे येथिल रहिवासी पी. पी. खारपाटील हायस्कुल चिरनेर येथे दहावीत शिकणाऱ्या कु. सोनाक्षी राहुल पाटील या गरीब गरजू मुलीस शैक्षणिक अर्थसहाय्य देण्याचा कार्यक्रम दानशूर व्यक्तिमत्व मनोहर पाटील वहाळ (माऊली), अध्यक्ष राजेंद्र भगत, सल्लागार नितेश पंडीत,सचिव सुनिल वर्तक,खजिनदार पिंट्या घरत, आणि सदस्य जीवन डाकी, शाम ठाकूर, स्वप्निल पाटील, मनीष पाटील, जगदीश कदम,विद्याधर गावंड,शिवमुद्रा डान्स अकॅडमी चे पपन पाटील तसेच कळंबूसरे गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि सोनाक्षीच्या संपूर्ण परिवाराच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
आपल्या समालोचन निवेदनाच्या मिळणाऱ्या मानधनातून काही रक्कम स्वइच्छेने असोसिएशन कडे जमा करून १० वी नंतर गरिबीमुले शिक्षण घेण्यास असमर्थ असणाऱ्या किंवा कठीण परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक अर्थसहाय्य, आदिवासी शाळेतील विध्यार्थ्यांना भोजन खाऊ व शैक्षणिक साहित्य व दप्तर वाटप,गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत, शाळांना संगणक, प्रिंटर अशी शैक्षणिक उपकरणे, अपंगांना व्हील चेअर, सायकल, शाळांना ब्लू टूथ स्पीकर प्रदान असे सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या शिवसंकल्प समालोचक असोसिएशन तर्फे आज १५ दिवसांपूर्वी तरुण वयातच वडिलांचे निधन झाल्याने शिक्षण सोडण्याची वेळ आलेल्या विध्यार्थिनीस आर्थिक मदत देऊन आधार दिला.
या प्रसंगी असोसिएशन च्या कार्यावर प्रभावित होऊन दरवर्षी असोशिएशन ला अश्या प्रकारच्या सामाजिक उपक्रमात नित्यनेमाने सहकार्य करणाऱ्या मनोहर पाटील यांच्या वतीने ही मदत केवल १० वी साठी नसेल तर ११ वी व १२ पर्यंत शिक्षण घेईपर्यंत माझ्यातर्फे केली जाईल असे कु. सोनाक्षीच्या परिवाराला आश्वासित केले.
कार्यक्रमाप्रसंगी असोसिएशन चे अध्यक्ष राजेंद्र भगत, आणि सुप्रसिद्ध निवेदक तथा असोसिएशन चे सल्लागार नितेश पंडीत यांनी प्रास्ताविकातून असोसिएशन च्या आजवरच्या कार्याचा आढावा आणि पुढील ध्येय विषद करून सर्व सभासदांच्या वतीने कु. सोनाक्षीला पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या व सर्वांचे आभार मानले.
मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्त जे एस पटेल व उरण परवाना आधिकारी सुरेश बागुलगावे या अधिकाऱ्यांनी उरण दिघोडे येथील घटनास्थळी भेट देऊन केली नुकसानाची पाहणी
11 hours ago
आ. महेश बालदी यांना आमदार म्हणून अपात्र घोषित करण्याच्या मागणीसाठी १ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर निघणार महाविकास आघाडीचा मोर्चा.
11 hours ago
राज्यस्तरीय शालेय सेपाकटाकरा स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींची चमकदार कामगीरी; संघाला तृतीय स्थान श्रुती मांटे ची राष्ट्रीय संघात निवड
11 hours ago
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा जालना महानगर च्या वतीने अभिवादन
11 hours ago
समतेचा विचार, शिक्षणाचा ध्यास आणि माणुसकीचा अखंड प्रकाश—- चित्रकार संतोष औटी महामानव क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन
1 day ago
जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दिव्यांग,वृध्द, निराधाराना न्याय हक्क द्या नसेल तर स्व ईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत शेकडो दिव्यांग धरने आंदोलनात सहभागी
1 day ago
गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेला प्राधान्य; तीन महिन्यांनी पुन्हा घेणार कामाचा लेखाजोखा! – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर
1 day ago
निवृत्तीवेतनधारकांनी 31 डिसेंबरपर्यंत हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे
1 day ago
संविधान दिनानिमित्त जालना येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
1 day ago
बालविवाह रोखण्यासाठी जालना जिल्ह्याचा पुढाकार; मुलींच्या शिक्षणासाठी सर्वस्तरांतून सहकार्याचा निर्धार