pub-7425537887339079
ब्रेकिंग

श्रामनेर संस्कार शिबिर काळाची गरज – महापौर वंदना मगरे

0 4 4 2 0 9
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.9

भारतीय बौद्ध महासभा, जालना यांच्या वतीने तक्षशिला बहुउद्देशीय संस्था संचालित तक्षशिला बुद्ध विहार, समर्थ नगर येथे आयोजित दहा दिवसीय श्रामनेर संस्कार शिबिराचा समारोप उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या महापौर वंदना मगरे यांनी आजच्या मोबाईल युगात अशा प्रकारची संस्कार शिबिरे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. समारोप कार्यक्रमाची सुरुवात श्रामनेर धम्म रॅली व पंचशील ध्वजारोहणाने झाली. ध्वजारोहण भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष (पश्चिम विभाग) राजेश सदावर्ते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तक्षशिला बुद्ध विहाराचे अध्यक्ष भिकाजी साळवे, कोषाध्यक्ष अरुण वाघमारे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. संघनायकांनी उपस्थित उपासक-उपासिकांना त्रिशरण व पंचशील प्रदान केले. महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, नगरसेविका ॲड. रिमाताई खरात, नगरसेवक विनोद रत्नपारखे व केंद्रीय शिक्षक रवींद्र दारोकार यांचे विविध मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक अरुण वाघमारे यांनी केले. आपल्या भाषणात महापौर वंदना मगरे म्हणाल्या, “अशा संस्कार शिबिरांमुळे बालकांवर चांगले संस्कार घडतात. हीच मुले उद्याची सुसंस्कृत आणि जबाबदार पिढी घडवतील.” उपमहापौर राजेश राऊत यांनीही देशाच्या विकासासाठी बालकांचे योग्य संस्कार आणि घडण महत्त्वाची असल्याचे सांगितले. कार्यक्रमात भिक्खू संघाने शिबिरातील अनुभव व मनोगत व्यक्त केले. तक्षशिला बुद्ध विहाराच्या सदस्यांचा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. समता सैनिक दलाचे कर्नल कुणाल दहिवले यांनी आकर्षक परेड सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रा. डॉ. राजकुमार म्हस्के यांनी उपासक-उपासिकांना भोजनदान दिले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमोद गायकवाड, सुदाम कांबळे, गुमनराव पारखे, राहुल वाकडे, संदीप इंगोले, आकाश शरणागत, महेंद्र साळवे आणि राजेश बगळे यांनी धम्मसेवा दिली. समारोप प्रसंगी महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, ॲड. रिमाताई खरात आणि विनोद रत्नपारखे यांच्या हस्ते श्रामनेरांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर थेरो भदंत शिवली भंते यांनी त्रिशरण-पंचशील देऊन श्रामनेरांना चीवरमुक्त करून उपासक रूपात आणले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश सदावर्ते होते. सूत्रसंचालन संदीप इंगोले यांनी तर आभार प्रदर्शन कर्नल कुणाल दहिवले यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 2 0 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे