ग्रामीण भागात अधिकमासची मोठी क्रेझ. धोंडा निमित्याने लेकबाळ जावाईचा आदर सन्मान. प्रथेनुसार वान आणि सन्मानभी.

टेंभुर्णी/प्रतिनिधी,दि.26
अधिकमास म्हणजे धोंड्याचा महिना थोडक्यात लेक आणि जावाई यांच्या मान सन्मान आणि त्यांचा आदर सत्कार करून आपल्या इच्छे नुसार त्यांना वान आणि भेट वस्तू देऊन एक मस्त छोट्याखानी कार्यकम करण्याची पद्धत आहे.हिंदू धर्मात लग्न झालेल्या नवीन जोडप्यासाठी धोंडा म्हणजे एक पर्वणी म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
ग्रामीण भागात ही प्रथा मोठ्या आनंदात साजरी केल्या जाते येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, संत सद्गुरू रंगनाथ महाराजांचे भक्त, व्यापारी श्री गणेशलाल बांगड यांनी आपल्या पांच ही मुली आणि जावई आणि त्यांच्या पूर्ण बांगड परिवार परिवार यांना सह स्नेह आमंत्रण देऊन त्यांचा आदर सत्कार करून हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला.
पंचांगाप्रमाणे दर अडीच-तीन वर्षांनी येणाऱ्या जास्तीच्या (अधिक) महिन्याला ‘धोंड्याचा महिना’ किंवा ‘पुरुषोत्तम मास’ म्हणतात. या महिन्यामध्ये 33 च्या आकड्याला अतिशय महत्त्व आहे. या महिन्यात जावयाला घरी बोलावून त्याचा सन्मान करण्याची आणि त्याला ३३ गोड धोंडे गव्हाच्या पिठाचे गोळे पुरण पोळी आंब्याचा रस सोबत इतर पक्वान्ने खाऊ घालण्याची प्रथा आहे.यालाच ‘धोंड्याचे जेवण’ असे म्हणतात. शहरी भागात हा कार्यक्रम भक्कम प्रमाणात केल्या जातात मात्र यात ग्रामीण भाग ही मागे राहिला नाही असेच म्हणावे लागेल. या महिन्याला पुरुषोत्तम मास यासाठी म्हणतात की प्रत्येक महिन्याचे स्वामित्व वेगवेगळ्या देवतेने घेतलेले आहे. परंतु या अधिक मासाचे स्वामित्व स्वतः विष्णू भगवान आणि म्हणजेच श्रीकृष्ण अवतारामध्ये म्हणून याच पुरुषोत्तम मास असे म्हणतात. चंद्र वर्ष 355 दिवस व सौर वर्ष 365 दिवस असतील या दहा अकरा दिवसाचे योग्य संतुलन करण्यासाठी अधिकचा महिना असतो. पंचांगाप्रमाणे येणारे सण उत्सव योग्य महिन्यात येतील यासाठीचा हा ताळमेळ खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून केला जातो. या महिन्यामध्ये नाम जप दानधर्म अधिक प्रमाणात केले जाते ज्याने पुण्य साठवण होते. अशी आख्यायिका आहे त्यामुळे या महिन्यांमध्ये दानधर्म आणि जप अनुष्ठान केल्या जाते. महाराष्ट्र मध्ये जावयांचे धोंडे जेवण हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न याच महिन्यामध्ये साजरा केला जातो.



