pub-7425537887339079
ब्रेकिंग

पायी जाणाऱ्या दिंडीतील भाविकांसाठी फराळ वाटप

0 4 8 3 5 2
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.29

गणेशपूर टेंभुर्णी येथून शेगाव नगरीकडे पायी जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज यांच्या दिंडीतील भाविकांसाठी हॉटेल राधिकाचे संचालक सोमीनाथ अंधारे यांच्या वतीने भक्तीभावाने फराळ वाटप करण्यात आले गजानन महाराजांच्या जयघोषात माऊलींच्या पालखीचे आणि पायी दिंडीचे परिसरात आगमन झाले. हॉटेल राधिकाचे संचालक सोमीनाथ अंधारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व वारकरी व भाविकांचे मनापासून स्वागत करून त्यांना ताजी व सकस फराळ पाकिटे वाटली. पायपीट करणाऱ्या वारकऱ्यांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला असून, अंधारे परिवाराच्या या सामाजिक व धार्मिक कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.या सेवाकार्यात हॉटेल राधिकाचे प्रतिनिधी, स्थानिक नागरिक आणि दिंडीचे प्रमुख सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

———————————————————————–
वारकरी शेगावकडे जात असताना अत्यंत कठीण परिस्थितीत पायपीट करतात. अशा वेळी त्यांना ऊर्जा आणि विसावा मिळावा, या उद्देशाने आम्ही या छोट्याशा सेवाकार्याचे आयोजन केले. संतांच्या चरणी ही आमची भक्तीभावाने केलेली सेवा असून, भविष्यातही हा उपक्रम आम्ही असाच सुरू ठेवणार.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 5 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे